पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेलेनगरातील रहिवासी अमोल बाबुराव राऊत हा दारूच्या नशेत असताना राहत्या घरात गळफास लावून घेत होता. सुदैवाने यादरम्यान त्याच्या मामाला याचा आवाज येताच घटनास्थळी धाव घेऊन त्याच्या गळ्यातील गळफास काढून पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पाटील यांनी केले व पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने प्रभारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, अनिल राठोड, राम ढाकरे, ईश्वर देशमुख, जितेंद्र परदेशी यांनी जमावावर नियंत्रण मिळविले.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रुग्णालयात कसबे उपसरपंच राजू जाधव, सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख गणी, शिवाजी राऊत, आशिष श. भिवसने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मदत कार्य केले.