पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील बँक आॅफ बडोदा शाखेत धाडसी चोरीचा प्रयत्न फसला. बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरटे सीसी टीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत.थंडीचा फायदा घेत बँकेच्या मागच्या बाजुचा दरवाजाचा व चैन गेटचे लॉक तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. कॅशियर कॅबिन, लॉकर रूममध्ये जाऊन लॉकर रूमचे लॉकर तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. याशिवाय चोरट्यांनी बँकेचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडून कॅमेºयाचे नुकसान केले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून, त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसते.ही घटना सकाळी गावातील लोकांच्या निदर्शनास आले. लागलीच बँक व्यवस्थापक प्रतीक शहा, कर्मचारी अनुप ठाकूर, रितेश जैन, ज्ञानेश्वर नावडे, पंकज पाटील हजर झाले.यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वान बॅकेच्या मागील बाजुच्या शेतातून नाल्यापर्यंत घुटमळला. श्वानपथकाचे पो.काँ.मंगल पारधी, झोपे तसेच जंजिर नावाचा श्वान, क्रॉईम ब्रॅँचचे सपोनि गांगुर्डे, ठसे तज्ज्ञ चौधरी चौधरी यांनी भेट दिली.बँकेला सुरक्षा रक्षक नाही, सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.पुढील तपास पिंपळगावचे सपोनि गजेंद्र पाटील व टीम करीत आहे. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास शेजारचा एक जण एक मोटारसायकल घेऊन आला. गाडीचा प्रकाश बँकेच्या उघड्या असलेल्या दरवाजावर पडल्याने आरोपींना पळ काढला असावा.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७, ३८०, ४२७, ५११ नुसार पिपळगाव हरेश्वर पोलीस ठायात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.