ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून भाजपाकडून काही संचालकांना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सुरेशदादा जैन गटाने आपले सर्व 13 संचालक सहलीवर रवाना केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 3 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव 14 विरुध्द 2 असा मंजूर झाला होता. त्यानंतर नवीन सभापती निवड ही मंगळवार, 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.सुरेशदादा जैन गटातर्फे लकी टेलर हे सभापतीपदाचे उमेदवार आहे. दरम्यान भाजपाने सुरेशदादा जैन गटाचे काही सदस्य आपल्यागटाकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या प्रय}ांना यश मिळू नये व खबरदारी म्हणून हे सर्व 13 सदस्य शनिवारी सहलीवर रवाना केले. काही सदस्यांना भाजपाकडे वळण्यासाठी मोठय़ा ‘ऑफर्स’ आल्या होत्या परंतु त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी एकनिष्ठता दाखवत त्या नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे उलटूनही सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रस्ताव 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका:यांकडे सादर केला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनीही सेनेला पाठिंबा देत सेनेची संख्या 10 वरुन 13 झाली होती. तर भाजपाची संख्या 3 वर आली होती. अविश्वास ठरावाला भाजपचे प्रभाकर सोनवणे गैरहजर राहिल्याने सभापतींच्या बाजूने केवळ 2 मते पडली होती. आता 21 रोजी होणा:या सभापती निवडीकडे आता लक्ष लागले आहे.