पहूर : येथील स्टेट बँक शाखा पहूर चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी केला आहे. या घटनेत रक्कम सुरक्षीत आहे. मात्र एटीएम मशिनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.औरंगाबाद -जळगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना सकाळी निदर्शनास आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँकेचे औरंगाबाद जळगाव महामार्गावर एटीएम आहे. पहाटे चोरट्यांनी एटीएम फोडून नुकसान केले आहे. पण सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरट्यांनी सावधानता बाळगून घटनास्थळावरून काढता पाय घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. बँकेचे अधिकारी दीपक दौलत तिवारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पहूरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:23 PM
रक्कम सुरक्षित : एटीएमएचे झाले नुकसान
ठळक मुद्देस्टेट बँक शाखा पहूर चे एटीएम फोडण्याचा प्रयत्नपहाटे चोरट्यांनी एटीएम फोडून नुकसान केलेचोरट्यांनी एटीएम फोडले रक्कम मात्र सुरक्षीत