जळगाव : शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या घटनेत दोन घरांचे दरवाजे जळाले आहेत. सर्व घरांमध्ये कुटुंबिय झोपलेले होते. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य काही कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. शहारात प्रथमच अशी घटना घडली आहे.याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने संशयित यात कैद झाले नाहीत.दरम्यान, या सोसायटीत २२ फ्लॅट आहेत. पहिल्या मजल्यावर २, दुसºया मजल्यावर तीन व तिसºया मजल्यावर २ असे एका इमारतीत सात फ्लॅट आहेत. हरिश विशनदास लखानी, दीपक ठाकूरदास ललवाणी, महेंद्र रेलुराम वालेचा, दीपक रामचंद्र संतवाणी, गिरीष नानकराम केवलरामाणी, इंदरलाल गोकुळदास मदनाणी व अजयकुमार ठाकूरदास ललवाणी आदी जण कुटुंबासह या फ्लॅटमध्ये स्वतंत्रपणे वास्तव्याला आहेत.दरम्यान, प्रकार लवकर लक्षात आला नसता तर दुर्घटना घडली असती मात्र सात घरांमधील एका रहिवाशाला जाग आल्याने दुर्घटना टळली. दरम्यान घरे कुणी का पेटविली हे कळू शकलेले नाही. या घटनेमुळे या सोसायटीमधील रहिवासी कमालीचे भयभीत झाले आहेत.
जळगावात एकाच इमारतीत सात घरे जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:53 PM
शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्देगणपती नगरातील घटना मशालीच्या सहाय्याने पेटविण्याचा प्रयत्नपोलिसात गुन्हा दाखल