जळगाव : थकीत वेतन मिळत नसल्याने सफाईचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंपनीचा कर्मचारी राजेंद्र भावसार याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर कर्मचाºयांचे लक्ष गेल्याने पुढील अनर्थ टळला, ही घटना मनपा टी.बी.रुग्णालयालयाच्या जवळील कचरा डेपोजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली.शहराच्या साफसफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. मक्ता दिल्यानंतर स्वच्छतेचे प्रश्न आजही कायम आहेत. दररोज मात्र नवीन वाद निर्माण होत आहेत. मंगळवारी वॉटरग्रेसच्या कर्मचाºयांनी वेतनासाठी कामबंद आंदोलन केल्यानंतर बुधवारी राजेंद्र परदेशी या कर्मचाºयाचे महिनाभराचे वेतन थकीत होते. ते मिळावे, यासाठी त्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मनपा टी.बी.रुग्णालय जवळील कचरा डेपोत हा प्रकार घडला.कामबंद आंदोलन झाल्यास मनपाने घेतली होती खबरदारीवॉटरग्रेसच्या कर्मचाºयांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केल्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला पहायला मिळाला. त्यानंतर मनपा प्रशासनाने बंद घंटागाड्यांवर ४० कर्मचाºयांना तातडीने रुजू करून काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वच्छतेचा प्रश्न कायम राहिला. महापालिकेने नेहमी निर्माण होणाºया वादाबाबत मक्तेदाराला नोटीस बजाविण्याचा सूचना दिल्या आहेत.नोकरीवरुन काढण्याचा इशारा दिल्याने आत्मदहनाचा निर्णयवॉटरग्रेसकडून सुरु असलेल्या घंटागाड्यांवर काम करणारे चालक व सफाई कर्मचाºयांनी मंगळवारी कामबंद आंदोलन ठेवले. त्यानंतर मक्तेदाराकडून सर्व कर्मचाºयांकडून लेखी म्हणणे घेवून यावर नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सर्व कर्मचारी कामावर रु जू झाले. परदेशी हे देखील कामावर रु जू होण्यासाठी आले. मात्र, कंपनीच्या अधिकाºयांनी कामावर घेण्यास नकार दिल्यामुळे परदेशी यांची संबधित अधिकाºयांशी शाब्दीक चकमकदेखील झाली. मक्तेदाराकडून कामावर घेण्यास नकार दिल्याने परदेशी यांनी रागाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इतर कर्मचाºयांचे लक्ष गेल्याने त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यात आले.मक्तेदाराच्या बिलांची अदायगी रोखा - उपमहापौरकचºयाचा प्रश्न गंभीर होत असल्याने वॉटरग्रेस कंपनीने जितके बील काढले आहे. त्या बिलांची रक्कम जोपर्यंत मक्तेदाराकडून कामात सुधारणा होणार नाही तो पर्यंत रोखून घेण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्निन सोनवणे यांनी मनपा मुख्य लेखा अधिकाºयांना दिल्या आहेत. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी लेखा अधिकाºयांना दिले आहे. महासभेत मक्तेदाराला महिनाभरात कामात सुधारणा करण्याचा इशारा दिला होता. मात्र, दहा दिवसात पाहणी केल्यास कोणतीही सुधारणा होत नसून, दररोज हा प्रश्न गंभीर होत जात आहे. मक्तेदाराला २ ट्रॅक्टरसह कंटेनर आणि इतर साहित्य भाड्यावर दिले आहे. मक्तेदाराने दोन महिन्याचे भाडे २ लाख १७ हजार रुपये इतकेच काढले असून, ही रक्कम १० लाखापेक्षा अधिक आहे. त्यामुळे याबाबतीत उपमहापौरांनी आदेश काढले आहेत.
सफाईचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:15 PM