जळगाव : साईडपट्टीवरून महामार्गाला लागणाºया ट्रकवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात सनी बळीराम खरोटे (वय १९ रा. अयोध्यानगर, जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला. ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे समजताच संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ट्रक अडवून चालकाला चोप देत, ट्रक पेटवण्याचा प्रयत्न केला. या वेळी ट्रकची तोडफोडही करण्यात आली. दरम्यान, सनी याची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी संध्याकाळी सव्वासात वाजता महामार्गावर कालिंका माता चौकाजवळ झाला. घटनेनंतर या भागात एकच गर्दी उसळली होती तर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सनी खरोटे हा तरुण खेडीकडून दुचाकीने (क्र.एमएच १९ बीबी-२५९३) कालिंका माता चौकाकडे येत असताना विरुद्ध दिशेने महामार्गाला लागत असलेल्या ट्रकवर दुचाकी जाऊन आदळली. त्यात सनी हा ट्रकच्या खाली आला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. हा अपघात होताच उपस्थित लोकांनी तातडीने सनीला जिल्हा रुग्णालयात तर तेथून खासगी हॉस्पिटलला हलवण्यात आले. तोडफोड करून ट्रक पेटवलाअपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर हल्ला चढवला. चालकाला चोप देण्यात आला, मात्र तो जमावाच्या तावडीतून निसटला. त्यानंतर लोकांनी ट्रकमधील उशी व रस्त्यावरील कापड पेटवून ट्रकच्या केबिनमध्ये टाकले तर काहींनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जमावाला पांगवले. नितीन बाविस्कर या कर्मचाºयाने ट्रकच्या केबिनमधील आग विझवून ट्रकचा ताबा घेतला. दरम्यान, गर्दी अधिक असल्याने अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला. शनिपेठचे निरीक्षक आत्माराम प्रधान, एमआयडीसीचे सुनील कुराडे, साहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील, उपनिरीक्षक प्राची राजूरकर, पवन राठोड या अधिकाºयांसह दोन पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.क्रेनच्या साहाय्याने ट्रक हलविलाजमावाच्या हल्ल्यात ट्रक महामार्गाच्या मधोमध थांबला होता. उपअधीक्षक सांगळे यांचे चालक संदीप पाटील यांनी ट्रकच्या स्टेअरिंगचा ताब घेत तो हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, टायर ब्लॉक झाल्याने ट्रक हलत नव्हता, त्यामुळे क्रेन मागवण्यात आली. तासाभराच्या मेहनतीनंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला.रुग्णालय व महामार्गावर तणावअपघाताचे वृत्त समजताच अयोध्यानगरातील सनीचे मित्र व त्याच्या नातेवाइकांनी घटनास्थळ व तेथून रुग्णालयात धाव घेतली. वेगवेगळ्या अफवा पसरल्याने नातेवाइकांच्या संतापात भर पडत होती, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी तत्काळ बंदोबस्ताचे नियोजन करून रुग्णालयात अधिकाºयांसह कर्मचाºयांचा ताफा तैनात केला. त्यामुळे संभाव्य घटना टळली. जिल्हा रुग्णालय, आॅर्किड हॉस्पिटल व ओम क्रिटिकल या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. सहायक निरीक्षक समाधान पाटील, महेश जानकर, उपनिरीक्षक गजानन राठोड, सुप्रिया देशमुख व अजितसिंग देवरे या अधिकाºयांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
अपघातानंतर जमावाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 09, 2017 12:50 AM