जामनेर, जि.जळगाव : सकल मराठा समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला तालुक्यातील सुमारे ७०० वर-वधूंनी हजेरी लावली. मेळाव्याचे उद्घाटन मराठा आरक्षण लढ्यातील अग्रणी विनोद पाटील, डी.डी.बच्छाव, प्रकाश पाटील व डी.एन.चौधरी यांनी केले.जिजाऊ वंदनेने मेळाव्याला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी राजे व संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मराठा आरक्षण लढ्यातील अग्रणी याचिका कर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की, समाजाला आरक्षण मिळणारच. युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती करावी.जि.प.चे माजी सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, समाजातील युवकांनी परिचय मेळाव्यानंतर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे. जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जे.के. चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीराम पाटील, अमर पाटील, प्रमोद पाटील, डी.के.पाटील, पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील, नीता पाटील, चंद्रकांत बाविस्कर, डॉ.प्रशांत भोंडे, डॉ.मनोहर पाटील, जगन्नाथ लोखंडे, राजेंद्र पाटील, डॉ.प्रशांत पाटील, प्रा.शरद पाटील, रवींद्र मराठे, व्ही.पी.पाटील, किशोर पाटील, डॉ.सुरेश पाटील, तुकाराम निकम, बाबूराव गवळी, पप्पू पाटील, किशोर खोडपे, उमेश पाटील, कमलाकर पाटील, ज्ञानेश्वर बोरसे उपस्थित होते. लोंढ्री येथील वधू व पुण्यातील वराचा यावेळी विवाह जुळला. २६ जानेवारीला त्यांचा साखरपुडा होईल.प्रास्ताविक सुनील चौधरी यांनी केले. दीपक ढोणी, विनोद पाटील, योगेश पाटील यांनी संचालन केले. एस.टी. चौधरी यांनी आभार मानले. प्रदीप गायके, अर्जुन पाटील, भगवान शिंदे, प्रल्हाद बोरसे, डॉ.बाजीराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, प्रमोद पाटील, दीपक पाटील आदींनी सहकार्य केले. तालुक्यातील मराठा समाजाच्या मेळाव्यास महिलांसह समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.यशस्वीतेसाठी डॉ.नंदलाल पाटील, डॉ.उमाकांत पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील, सुनील गायकवाड, प्रवीण पाटील आदींनी परिश्रम घेतले.जुळणाºया पहिल्या विवाहास भेट...या मेळाव्यातून जुळणाºया पहिल्या विवाहास केकतनिंभोरा येथील दशरथ पाटील यांच्याकडून आर.ओ. मशीन भेट देण्यात येणार आहे. तसेच या प्रवीण गावंडे आणि देवीदास ठुबे यांच्याकडून पहिल्या विवाहासाठी शूटिंग व फोटो अल्बम पूर्णपणे मोफत करून देण्यात येणार आहे. तसेच कुलदैवताचे दर्शन विनामूल्य घडवून आणण्यात येणार आहे. उपस्थित सर्वांचे बायोडाटा संकलन करण्यात आले असून लवकरच पी.डी.एफ बुक तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे. योगेश चोपडे, पंकज चोपडे यांच्याकडून मोफत मंडप देण्यात येणार आहे.
जामनेरला वर-वधू परिचय मेळाव्यात ७०० उपवरांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 7:44 PM
सकल मराठा समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला तालुक्यातील सुमारे ७०० वर-वधूंनी हजेरी लावली.
ठळक मुद्देलोंढ्री येथील वधू व पुण्यातील वराचा जुळला विवाहजुळणाऱ्या पहिल्या विवाहास अनेकांकडून भेटी