घरगुती बियाणे राखून ठेवा
जळगाव : सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्यासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा
जळगाव : कोरोना काळात सतत काम करीत असलेल्या कोविडशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी महामारी योद्धा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या विविध पदावरील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना नियमित करावे, त्यांच्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन राखीव ठेवावे, कीट उपलब्ध व्हावे अशा विविध मागण्या केल्या आहेत. निवेदनावर संस्थापक संतोष भांडे यांची स्वाक्षरी आहे.
मास्कचा वापर नाही
जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी चाचणी करीत असलेल्या ठिकाणी अनेक जण मास्कचा वापर करीत नाही. सोमवारी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या ठिकाणी देखील अनेकांनी मास्क लावलेला नव्हता. यामुळे संसर्गवाढीची भीती व्यक्त होत आहे. यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले असले तरी रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर फिरतच आहे. मात्र दुपारी कडाक्याचे ऊन असल्याने रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.