गोंडगाव ता. भडगाव : सर्व शाळांमध्ये दररोज तीन वेळा हजेरी घ्यावी आणि विद्याथ्र्याची सुरक्षा शाळा प्रशासन व शिक्षकांचीच राहील, याबाबत शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. याबाबत अंमलबजावणी संदर्भात राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे. विद्याथ्र्याकडे अधिकाधिक लक्ष राहावे, शाळा परिसरात अनुचित प्रकार घडू नये, आदी उद्देशाने ही नियमावली तयार केली असून या नवीन नियमावलीत म्हटले आहे की, शाळेच्या वेळेत विद्याथ्र्याचे पालक किंवा नातलग काही कारणास्तव विद्याथ्र्याना घेण्याकरिता आल्यास त्यांच्याकडून अर्ज घेऊनच विद्याथ्र्यास सोडावे. माता-पालक संघाची सभा घेण्यात यावी, इतर कार्यक्रम सक्षम अधिका:यांच्या पूर्वपरवानगी घेऊन आयोजित करावे. शैक्षणिक सहलही शैक्षणिक अनुभूती मिळेल, अशाच ठिकाणी नेण्यात यावी. शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघाची सभा स्त्री-पुरुष सोबत घेण्यात यावी. सहलीत 50 टक्के महिला शिक्षिका असाव्यात. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या बसेसमधून ये-जा करणा:या विद्यार्थिनींना बसस्टॉपर्पयत सोडणे, बसमध्ये बसविणे अनिवार्य आहे.दरमहा घ्यावी लागणार बैठकप्रशासनाद्वारे दरमहा बैठक आयोजित करण्यात यावी. या बैठकीचा अहवाल जिल्हाधिका:यांकडे वेळोवेळी देण्यात यावा. अशा अनेक प्रकारच्या नियमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरून करण्यात यावी, असेही आदेशाद्वारे संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.चारित्र्य तपासून नियुक्तीखासगी शाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चालक, शिपाई यांचे चारित्र्य तपासूनच नियुक्ती करावी, अशीदेखील सूचना या नव्या नियमावलीत करण्यात आली आहे. याचबरोबर शालेय गणवेश शासन नियमानुसार असावेत. तसेच शाळेतील बैठक व्यवस्था वेगळी असावी. विद्याथ्र्याचे शौचालय स्टाफ रूमपासून दूर असावे तर मुलींच्या प्रसाधनगृहाजवळच एका महिला शिपायाची नियुक्ती करावी लागणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारकविद्याथ्र्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तक्रार निवारण समिती गठीत करावी, तक्रारपेटी ठेवणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.शाळेत मोबाइल आणण्यासाठी परवानगीविद्याथ्र्याना शाळेत मोबाइल आणण्यास परवानगी मिळाली, आपण सर्व मोबाइल शिक्षकांमार्फत जमा करून ते मुख्याध्यापकांकडे देण्यात यावे, अशा सूचना आहेत.विद्याथ्र्याची जबाबदारी शिक्षक व प्रशासन विभागाची असली तरी पालकांचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे. शासनाची कुठलीच योजना जास्तकाळ टिकत नाही. त्यामुळे शासनाचे एकना धड भाराभार चिंध्या असेच धोरण असल्याचे वाटते. - विलास नेरकर, अध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनानवीन नियमावलीनुसार तीन वेळेस विद्यार्थी हजेरी घेणे शक्य आहे. आम्ही आता सद्य:स्थितीत दोन वेळेस हजेरी घेत असतो. आणि विद्याथ्र्याची काळजी आणि जबाबदारी आम्ही परिपूर्ण पार पाडत असतो. जवळपास नवीन नियमावलीनुसारच कामकाज सुरू आहे. - भाऊसाहेब जगताप, व्ही.एच.पटेल प्राथ.विद्यालय, चाळीसगाव
विद्याथ्र्याची रोज तीन वेळा हजेरी
By admin | Published: March 27, 2017 11:58 PM