जळगाव : कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा ठेका असो की वॉटरग्रेस वॉटरग्रेसला पुन्हा ठेका दिल्यावरून भाजपतील मतभेद सध्या चर्चेचा विषय आहे. महासभेच्या निमित्ताने या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यावर महासभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच उपमहापौर, गटनेते बदलाच्या हालचालीचेही पडसाद यात उमटतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तसे झाले तर शिवसेना भाजपामधील अंतर्गंत गटबाजीचा फायदा घेऊन आक्रमक पद्धतीने सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला कोंडित पकडण्याची शक्यता आहे.
जेवणे चांगले-वाईटचा मुद्दाशहरात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने निकृष्ठ जेवण आणि कोविड सेंटरमधील अस्वच्छता बाबत रुग्णांकडून तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा व इतर नगरसेवकांनी शासकीय अभियांत्रिकीमधील कोविड सेंटरची पाहणी करून जेवणाचा दर्जा व स्वच्छतेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे मात्र महापौर भारती सोनवणे यांच्याकडून जेवणाचा दर्जा व तेथील सोयी सुविधा उत्तम सांगण्यात येत आहे.यामुळे भाजपमधील अंतर्गंत नाराजी उघडपणे दिसून आली. विशेष म्हणजे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी त्यांच्याच पक्षाच्या महापौरांकडे तक्रार न करता, आयुक्तांना पत्र देऊन जेवणाचा ठेका बंद करण्याची मागणी केलीे. या पत्राची दखल घेऊन प्रशासनाने भोजनासाठी निविदा काढून, प्रस्तावदेखील मागविले आहेत.वॉटरग्रेसवरून आमने-सामनेवॉटरग्रेसचा ठेका पुन्हा सहा महिन्यांनी वॉटरग्रेसला देण्यात आल्याने भाजपमधील दोन गट पुन्हा छुप्या पद्धतीने एकमेकांवर आरोप करित आहेत.नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तर या ठेक्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रशासनाने कायदेशीर बाबी दाखवून, स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वॉटरग्रेसच्या मुद्यावरून सत्ताधाºयांमध्येच अंतर्गंत हा कलह महासभेच्या निमित्ताने बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच सत्ताधारी नगरसेवकांच्याच प्रभागात संथ गतीने विकास कामे सुरू असल्याने, या नाराजीचेदेखील पडसाद या महासभेत उमटण्याची शक्यात वर्तविली जात आहे.शिवसेना संधीचे सोने साधत आक्रमक होण्याची शक्यतासत्ताधाºयांमधील कोविड आणि वॉटरग्रेसच्या मुद्द्यावरून अंतर्गत गटबाजी पाहता याचा फायदा घेऊन शिवसेना सत्ताधाºयांना कोंडिच पकडण्याची शक्यता आहे. तसेच कोविडसह, शहरातील अनियमित स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, निविदांमधील घोळ आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या दुषीत पाण्यावरून प्रशासनाला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाच महिन्यातून होणारी आजची महासभा विविध मुद्यांवरून गाजण्याची शक्यता असून, भाजपला विरोधी पक्षाकडून होणाºया आरोपांना उत्तर देण्यासाठी मोठ्या कसोटीला उतरावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे खांदेपालटचा निर्णय लांबणीवरसत्ताधारी भाजपतर्फे महापालिकेत दरवर्षी महापौर व उपमहापौर पदासाठी ज्येष्ठाना संधी देण्यात येणार आहे. यंदा विद्यामान उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षातर्फे उमेदवाराचा शोध सुरू होता. यामध्ये सुनील खडके यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, शासनाने कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व निवडणूक प्रक्रियेला बंदी घातल्यामुळे, मनपातील खांदेपालटचा निर्णय लांबणीवर पडला आहे. तसेच गटनेते भगत बालाणी यांच्याकडील गटनेते पदाची जबाबदारी काढून जितेंद्र मराठे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.