उत्तम काळे / ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त रविवारी सकाळी भुसावळ ते पाडळसे दरम्यान भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये तब्बल 2000 दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदविला. या रॅलीने लक्ष वेधून घेतले. भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त रविवारी सकाळी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयापासून या रॅलीस सुरुवात झाली. भुसावळ शहरातील विविध भागात फिरून ही रॅली पाडळसे येथील अधिवेशस्थळाकडे रवाना झाली.
लक्षवेधी रॅलीरॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी फेटे परिधान करून हाती ध्वज घेतले होते. शहरातून ही रॅली फिरत असताना तसेच पाडळसे मार्गावरून जात असताना सर्वाचे लक्ष वधून घेत होती. या रॅलीमध्ये सहभागी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.