शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पाच महिन्यांसाठी २१ वाळू गटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:49 AM

जळगाव : जिल्ह्यातील पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या २१ वाळू गटांची ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रिया सोमवारी प्रशासनाने जाहीर केली असून ...

जळगाव : जिल्ह्यातील पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या २१ वाळू गटांची ई-लिलाव आणि ई-निविदा प्रक्रिया सोमवारी प्रशासनाने जाहीर केली असून यानुसार सोमवारपासूनच निविदा भरण्यास सुरुवात झाली आहे. २० जानेवारीला या निविदा उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, या लिलाव आणि निविदांची ९ जून २०२१ पर्यंतच मुदत राहणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.

यात सोमवार ४ ते १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून १५ रोजी सायंकाळी पाच वाजता ही नोंदणी बंद होणार आहे. १९ जानेवारीपर्यंत रक्कम जमा करणे अनिवार्य राहील, तसेच ४ ते १९ जानेवारीपर्यंत निविदा ऑनलाइन जमा करणे, १९ रोजी सायंकाळी ई-निविदा ऑनलाइन स्वीकारणे बंद होणार आहे. तर २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ई-ऑक्शन ऑनलाइन सुरू राहील. त्यानंतर ३ वाजल्यानंतर पुढे ई-निविदा उघडण्यात येणार आहेत.

या गटांचा वाळू लिलाव

वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बुद्रुक, केऱ्हाळे बुद्रुक, धुरखेडा, पातोंडी, दोंधळे, बलवाडी, घाडवेल, धावडे, सावखेडा, बांभोरी प्र.चा., आव्हाणी, नारणे, टाकरखेडा, वैजनाथ, उत्राण अ.ह., भोकर, पळसोद आदी गटांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ७० हजार २८६ ब्रास हा एकत्रित अंदाजित वाळूसाठा आहे. त्याची अपसेट प्राइज ही २८ कोटी ६४ लाख ८५ हजार ७३६ इतकी आहे.