जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आजारावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाºया बिलांच्या लेखापरीक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाºया बिलांविषयी शंका असल्यास नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार करता येणार आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाºया उपाययोजनांतर्गत कोरोना बाधित, संशयित रुग्णांवर उपचार व देखभाल करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालये तसेच काही खाजगी रुग्णालयेदेखील कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनावर पूर्णत: मोफत उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या सोबतच जिल्ह्यातील १२ खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या बिलांचे तसेच तक्रारी प्राप्त झालेल्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे.या संदर्भात काही तक्रारी असल्यास तसेच खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांविषयी शंका असल्यास नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधावा व सहकार्य घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 12:38 PM