जळगाव : जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू असले तरी ही संख्या कमी आहे. त्यामुळे कापूस खरेदी केला जाणार नाही अशी भीती शेतकऱ्यांची आहे. मात्र, शेतकऱ्यांची अडचण समजून अजून काही ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत खरीप हंगाम नियोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फ्ररन्सिंग वरील बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हेदेखील उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात कापूस खरेदीदेखील थांबविण्यात आली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली. याठिकाणी केवळ २० वाहनांनाच प्रवेश दिल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती.त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार कितीही वाहनांव्दारे कापूस खरेदीस काहीही हरकत नसल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांचा माल खरेदी केला जाणार असून, अजून काही ठिकाणी केंद्र सुरु केल्यानंतर ही समस्यादेखील मार्गी लागणार आहे.केळी विकास महामंडळाच्या मुख्यालयाची मागणीजिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा खरीप हंगामासाठी सज्ज झाली असून खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात केळी विकास महामंडळाचे मुख्यालय व्हावे याकरिता पालक मंत्र्यांनी मंत्रीमंत्रळाच्या बैठकीत मागणी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून पोखरा अतंर्गत जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पूर्वसंमती घेऊन शेती उपयोगी उपकरणे खरेदी केली आहे. त्यांना त्याची रक्कम मिळण्याची मागणीही शासनाकडे केली आहे असेपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात वाढीव केंद्र सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:58 PM