पाळधी, ता. जामनेर: झाडे लावा-झाडे जगवा हा नारा देत दरवर्षी पावसाळ्यात जनतेला वृक्षारोपणाचा संदेश देणाऱ्या शासनाला रस्ता रुंदीकरणात वृक्षतोड केलेल्या रस्त्यावर वृक्ष लागवडीचा विसर पडला असल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मागील तीन ते चार वर्षांपूर्वी जळगाव औरंगाबाद महामार्गाचे रस्ता रुंदीकरण ाचे काम सुरू केले आणि या महामार्गावरील घनदाट रस्त्याचे रूपांतर ओसाड रस्त्यात झाले. वृक्षतोडीच्यावेळी सांगण्यात येत होते की, लवकरच या महामार्गावर नवीन वृक्ष लागवड करण्यात येईल व हे रस्ते पुन्हा हिरवेगार होतील. परंतु असे काहीच झाले नाही.पहुर ते पाळधी या पाच किमी अंतरामध्येच शेकडो वृक्ष होते परंतु रस्ता रुंदीकरण नंतर आज या रस्त्यावर एकही वृक्ष लावण्यात आलेला नाही. जळगाव- औरंगाबाद या महामार्गा शेजारीच असलेला पहूर- इंदुर हा महामार्ग उशीरा सुरु करण्यात आला व या महामार्गाचे कामही वेगात सुरु झाले तसेच यावर मागील वर्षीच वृक्षारोपण करण्यात आले आहे.यामुळे या मार्गावरील वृक्ष हे या पावसाळ्यात चांगल्या प्रकारे टवटवीत दिसत आहेत. अशीच वृक्ष लागवड औरंगाबाद मार्गावर होण्याची मागणी आहे.वृक्ष लागवडीबाबत शासन निष्काळजी असून रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याच्या अगोदर नवे रोपे जगविण्याचे नियोजन होणे महत्त्वाचे होते. आता तरी लवकर वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे काम हाती घ्यावे.-डब्ल्यू. एस. पाटील, वृक्षप्रेमी व सेवानिवृत्त मुख्याध्यापकजळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात येईल.-अभिजित घोडेकर, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग जालना विभाग
औरंगाबाद महामार्ग ३ वर्षांपासून वृक्षारोपणाच्या प्रतीक्षेत ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:09 PM