जळगाव- जिल्ह्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळा संस्थांच्या परिशिष्ट १ वर असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच आदेश देण्याचे अधिकृत अधिकार असून परिशिष्ठ १ वर नसलेल्या पदाधिकाºयांची सहीने पत्रव्यवहार केल्यास संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़जे़ पाटील यांनी दिले आहे़ दरम्यान, हे आदेश काढले असले तरी नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिशिष्टमध्ये कोणाचेही नाव नसल्याने कोणाचे आदेश ग्राह्य धरले जाणार याबाबत साशंकता आहे.धर्मदाय उपायुक्त जळगाव यांच्या कार्यालयाच्या परिशिष्ट एकवर असलेल्या संचालक मंडळ वैध समजण्यात यावे आदेश पारीत करण्यात आले होते. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाडे या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे शाळा, संस्थेच्या कर्मचाºयांची बदली, नियुक्ती ठराव किंवा अन्य पत्र व्यवहार हा धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार संस्थेच्या परिशिष्ट १ वर असलेल्या पदाधिकाºयांच्या सहीनेच स्विकारण्यात यावे; असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी केले आहे. असे न झाल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य यांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असे पत्रकात म्हटले आहे़नुतन मराठाबाबत साशंकतापरिशिष्ट १ वरील नाव असलेल्या पदाधिकाºयांच्या ग्राह्य धरण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहे. मात्र मराठा विद्याप्रसारक मंडळाचे नुतन मराठा महाविद्यालयाच्या परिशिष्ट १ वर कोणत्याही पदाधिकाºयांचे नाव नाही. शिवाय गेल्या वर्षभरात संस्थेच्या झालेल्या बदल्या, बढत्यांवर झालेल्या आदेश रद्द होते कि नाही? याबद्दल शाशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत विचारणा केली असता, शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़