भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना येथील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजसमोरील जगदीश ऑटो पार्ट या दुकानदाराकडून पालिका प्रशासनाने पाच हजार रुपये दंड वसूल करून कारवाई केली.संबंधित ऑटो पार्टचे हे दुकान उघडे असून साहित्याची विक्री करीत असल्याची माहिती पालिका व पोलीस प्रशासनाच्या पथकाला मिळाली. यामुळे या दुकानदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत नियमांचा भंग केला. म्हणून पाच हजार रूपये दंड वसूल करण्याची कारवाई दि.१९ रोजी पथकाने केली. या पथकात वरिष्ठ लेखाधिकारी संजय बाणाईते, किशोर जंगले, विशाल पाटील यांचा समावेश होता. दरम्यान, दुकानदाराने तासभर पथकाशी हुज्जत घातली. त्यानंतर पथकाने सक्त कारवाई करीत दुकानदाराकडून पाच हजाराचा दंड वसूल केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.---
भुसावळात ऑटो पार्टस दुकान उघडले, पालिका प्रशासनाने केला पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:16 IST