मुक्ताईनगर, जि.जळगाव : मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची एकूण ४२ हजार ३९५ पुस्तके येथील शिक्षण विभागाला रविवारी प्राप्त झाली आहेत. उर्दू व सेमी माध्यमाच्या पुस्तकांची मात्र अद्याप प्रतीक्षा आहे.मुक्ताईनगर येथील गटसाधन केंद्रात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची उर्दू व सेमी माध्यमाची पुस्तके वगळून मराठी माध्यमाची पुस्तके प्राप्त झाली.तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तके मागवण्यात आली आहेत. ही पाठ्यपुस्तके ३० मेपर्यंत तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणार आहेत यातील पहिला टप्पा १९ रोजी प्राप्त झाला आहे. यात पहिलीचे २३५५ संचांमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती, इयत्ता दुसरीत १८९० संचांमध्ये गणित, बालभारती, इंग्रजी, इयत्ता तिसरीमधील २१४० संचांमध्ये बालभारती, परिसर अभ्यास, इंग्रजी, गणित, इयत्ता चौथी मध्ये २३४० संचांमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती परिसर अभ्यास, इयत्ता पाचवीमध्ये २४१९ संचांमध्ये बालभारती, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, हिंदी, इयत्ता सहावीत २४१९ संचांमध्ये बालभारती, इतिहास, गणित, भूगोल, सामान्य विज्ञान, हिंदी, इंग्रजी, इयत्ता सातवीत २४२६ संचांमध्ये बालभारती, इतिहास, गणित, इंग्रजी, हिंदी, सामान्य विज्ञान, भूगोल, इयत्ता आठवी २५५१ संचांमध्ये सुलभ भारती, विज्ञान, गणित, इतिहास-नागरिक शास्त्र, इंग्रजी अशी एकूण ४२,३९५ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत.दरम्यान, पं.स.सदस्य विकास पाटील यांनी पुस्तके उतरवण्याच्या ठिकाणी भेट दिली. जिल्हा स्तरावरून प्राप्त आदेशान्वये एम.एस.मालवेकर, वाय.बी. भोसले, मधुकर सैतवाल हे कर्मचारी पुस्तके उतरवताना उपस्थित होते.तालुक्यातील आवश्यक असलेल्या पुस्तक मागणी संख्येनुसार पहिल्या टप्प्यात मराठी माध्यमाची पुस्तके प्राप्त झाली आहेत. पुढील दोन टप्प्यात सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाची पुस्तके उपलब्ध होणार आहे.- विजय सरोदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, मुक्ताईनगर
मोफत पुस्तके उपक्रमात मुक्ताईनगरात मराठी माध्यमाची पुस्तके शिक्षण विभागाला उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 7:42 PM
मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची एकूण ४२ हजार ३९५ पुस्तके येथील शिक्षण विभागाला रविवारी प्राप्त झाली आहेत.
ठळक मुद्देउर्दू व सेमी माध्यमाच्या पुस्तकांची प्रतीक्षासर्व पाठ्यपुस्तके ३० मेपर्यंत तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणार