- कुंदन पाटील
जळगाव : गेल्या दोन महिन्यात वादळी पावसासह गारपिटीमुळे अनेक लॉन्ससह उघड्यावर लग्नसोहळे पार पाडणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. एप्रिल महिन्यातही पावसाची शक्यता वर्तविली गेल्याने अनेकांनी लग्नसोहळे बंदिस्त सभागृहात हलविले आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच गारपिटीसह वादळाचेही संकट सातत्याने सुरु आहे.त्यामुळे लग्नसोहळ्याच्या आयोजनात विघ्न घोंगावत आहे. ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून अनेकांनी आता लग्नसोहळे बंदिस्त सभागृहात पार पाडण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. त्यामुळे शहरातील बंदिस्त सभागृहांच्या तारखा आता मिळणेही मुश्कील झाले आहे.
शहरात सद्यस्थितीला २३ बंदिस्त सभागृह आहेत. काही लॉन्सभोवती तर काही काही हॉटेल्समध्ये हॉल आहेत. सर्वसामान्यांचा कल मात्र बहुउद्देशीय व समाज मंगल कार्यालयांकडे दिसून येत आहे.
शहरातील बंदिस्त सभागृह
खोटेनगर -०१बी.जे.मार्केट परिसर-३काव्यरत्नावली चौक-०१शिरसोली रोड-०४कालिकामाता चौक-०२जिल्हापेठ-२रिंगरोड-०२आंबेडकर मार्केट परिसर-०२प्रेमनगर-०१कोल्हे हिल्स-०१एमआयडीसी-०४एकूण-२३
लग्नाचे मुहूर्त
मे: दि. २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०
जून: दि. १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८
कसे असेल हवामान?
‘आयएमडी’च्या आगामी आठवडाभराच्या अंदाजानुसार दि.५ मे रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १० मेपर्यंत नीरभ्र वातावरण राहिल. या कालावधीत ढगाळ वातावरण मात्र कायम राहणार आहे. तसचे तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहील.