जळगाव : गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने सरासरीची पन्नाशी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५१.४ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर इतके असून मागील वर्षी ६ आॅगस्ट,२०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त ३९ टक्के म्हणजेच २५६.२ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र ३४०.८ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक ६६.३ टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच ४४.४ टक्के पाऊस भडगाव तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात ६ आॅगस्ट रोजी एका दिवसात ११.७ मि.मी. सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (६ आॅगस्ट) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका - ३४४.४ मिलीमीटर (५०.१ टक्के), जामनेर- ४७८.७ मि.मी.(६६.३), एरंडोल- ३४८ मि.मी. (५५.८), धरणगाव - २९९.२ मि.मी. (४८), भुसावळ - ३६९.१ मि.मी. (५५.६), यावल - ३५५.८ मि.मी. (५१), रावेर - ३४६.५ मि.मी. (५१.९), मुक्ताईनगर - ३६६.३ मि.मी. (५८.६), बोदवड - ३५८.३ मि.मी. (५३.३), पाचोरा - ३८९.८ मि.मी. (५२.४), चाळीसगाव - ३७१.८ मि.मी. (४५.७), भडगाव - २६७.५ मि.मी. (४४.४) अंमळनेर - २५९.५ मि.मी. (४४.६), पारोळा - २९८.५ मि.मी. (४८.४), चोपडा - २९८.३ मि.मी. (४६.९) याप्रमाणे जिल्ह्यात सरासरीच्या ५१.४ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.उघडीप नसल्याने रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यतागेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होत आहे. खरीप पिकांना देखील चांगलाच लाभ होत आहे. मात्र, संततधार पावसामुळे उघडीप नसल्याने कपाशीवर मोहाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, वाफसा नसल्याने शेतांमधील निंदणीचे काम देखील थांबले आहे. त्यामुळे काही दिवस उघडीप होण्याची प्रतीक्षा बळीराजाला लागून आहे. यंदा जरी २३ दिवस उशिराने पावसाला सुरुवात झाली असली तरी आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. उडीद, मूग, मका, सोयाबीन पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. तर भुगर्भातील जलपातळीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बोअरवेल्सचे पाणी आटले होते. अशा बोअरवेल्सला देखील पाणी आले असल्याने शेतकरी सुखावला आहे.गिरणा धरणात ५१.३२ टक्के पाणी साठाचाळीसगाव - नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच प्रकल्पांमधून गिरणा धरणात पाणी मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने गिरणा धरणात मंगळवारी सायंकाळी ६ पर्यंत एकूण ५१.३२ टक्के जलसाठा झाला. चणकापूर धरणातून १०६१२ क्येसूस, पुनद ८६३ क्येसूस, ठेंगोडा मधून १३६१० क्येसूस, हरणबारी मधून ३६८९ तर केळझर मधून १३६४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरु आहे. यामुळे ६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात १२ हजार ४९४ दलघफू इतका पाणी साठा झाला. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने या धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पाऊस कायम राहिल्यास वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भावपाऊस सतत सुरु असल्यामुळे कपाशीवर मोहाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये मोहाची लागण झाली असून यामुळे किड पडण्याची शक्यता बढावली आहे. तसेच मक्यावर देखील लष्करीअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. मात्र, ससत पाऊस सुरु असल्याने फ वारणीचा देखील फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मूग, उडीदला फायदा झाला असला तरी सतत च्या पावसामुळे या पिकांवर बुरशीजन्य पिकांची लागण होण्याचीही शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ५१.४ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:08 PM