शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:04 PM

एकुलत्या मुलाच्या निधनाच्या विरहाने नैराश्य आलेल्या कोकीळाबाई यशवंत पाटील (वय ६३) या वृध्देने राहत्या घरात  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शुक्रवारी ६ वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देआव्हाणे येथील घटना चार महिन्यांपूर्वी तरुण मुलाचा मृत्यूपहाटे ५ वाजता घेतला गळफास

आॅनलाईन लोकमत,

जळगाव दि.४-एकुलत्या मुलाच्या निधनाच्या विरहाने नैराश्य आलेल्या कोकीळाबाई यशवंत पाटील (वय ६३) या वृध्देने राहत्या घरात  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शुक्रवारी ६ वाजता उघडकीस आली. कोकीळाबाई या घरात एकट्याच राहत होत्या, पतीचे वीस वर्षापूर्वी निधन झाले  आहे. तर आधारस्तंभ असलेल्या मुलालाही चार महिन्यांपूर्वी परमेश्वराने हिरावून घेतल्याने त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. 

तालुक्यातील आव्हाणे येथे कोकीळाबाई यशवंत पाटील या घरात एकट्याच राहत होत्या. चार महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा विक्रम पाटील यांचे चार महिन्यांपूर्वी  अचानक निधन झाले आहे. मुलाच्या निधनानंतर सून प्रतिभा पाटील यांचे वढोदा ता.चोपडा या ठिकाणी दुसरे लग्न लावून दिले. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्या दुमजली घरात एकट्याच  राहत होत्या. एकुलत्या एक मुलाच्या निधनाच्या धक्कयापासून त्या सावरल्या नसल्याने त्यांना  नैराश्य आले होते. 

पहाटे ५ वाजता घेतला गळफासकोकीळाबाई या सकाळी नेहमी ५ वाजेपासून उठून नेहमी मंदिरात जातात. मात्र ६ वाजल्यावर देखील त्या घराबाहेर न आल्याने घरासमोर राहणाºया दिपमाला चौधरी यांनी आवाज दिला. तसेच घराचे दार देखील उघडेच होते,  घरातून आवाज न आल्याने दिपमाला यांनी घराचे दार उघडले. त्यांना समोर कोकीळाबाई यांचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी लगेच आरडाओरड केली. त्यानंतर तेथे शेजारच्यांनी धाव घेतली. कोकीळाबाई यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदन  झाल्यानंतर  मृतदेह गावात नेण्यात आला. तेथे  सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.