सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना बºयापैकी यश आलेले आहे, मात्र शंभर टक्के धंदे बंद झालेले नाहीत. शहरात लपून छपून तर ग्रामीण भागातही अवैध धंदे सुरु आहेत. अमळनेर, पाचोरा, जामनेर, भुसावळ या तालुक्यांमध्ये धंदे सुरुच असून संबंधित पोलीस आजही या धंदे चालकांकडून हप्ते वसूल करीत आहेत. धंदे सुरु असल्याचे पुरावे हे वेळोवेळी झालेल्या कारवायांमधूनच सिध्द होत आहे. कोणताही धंदे चालक हा पोलिसांच्या मर्जीशिवाय धंदा करु शकत नाही. यात काही पोलीस अधिकाºयांच्या नावाने तर काही पोलीस स्वत:च्या जबाबदारीवर हप्ते घेत आहे. पोलीस अधीक्षकांच्या कडक भूमिकेमुळे शक्यतो अधिकारी रिस्क घ्यायला तयार नाही, मात्र धंदे चालक व हप्ते गोळा करणारा पोलीस हे दोन्ही एकमेकाच्या हमीने धंद्याला चालना देत आहेत. वरिष्ठांना हप्ते द्यावे लागत नसल्याने कर्मचारीच खुशीत आहे, याबाबतची चर्चा पोलिसांमध्येच सुरु आहे.पोलीस स्टेशनमधील वाहतूक शाखा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अवैध प्रवाशी वाहतूक करणारे असो कि भार क्षमतेपेक्षा माल वाहून नेणाºया अवजड वाहनधारकांकडून हप्ते वसुली करीत असल्याची ओरड आहे. महामार्गावर तर पोलीसच अधिकाºयांच्या हालचालीवर लक्ष ठेवून वसुली करीत आहेत. रस्त्याने एखाद्या अधिका-याचे वाहन गेले की वाहतूक पोलीस दुसºया पोलिसाला सावध करत असल्याचे अनुभव येत आहे. पोलीस अधीक्षकांना जेव्हा जेव्हा अवैध धंद्याची माहिती मिळाली आहे, तेव्हा तेव्हा मोठी कारवाई झालेली आहे. आरोपींची संख्याही अधिक असून रोख रक्कम किंवा गुटखासारख्या मालाची किंमत लाखोच्याच घरात आहे. या कारवाया पाहता जिल्ह्यात पूर्णपणे अवैध धंदे बंद झाले नसल्याची पुष्टी मिळत आहे. अवैध धंद्यात सट्टा, जुगार इतका मर्यादित नसून अवैध प्रवाशी वाहतूक, रेशन, जिलेटीन, गुटखा, डांबर व इतर अन्य व्यवसाय नजरेत भरणारे नाहीत, मात्र पोलिसांच्या यादीत हे व्यवसाय करणारे देखील आहेत.
अवैध धंद्यांना आळा, मात्र पूर्णपणे बंद नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:25 PM
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यात त्यांना बºयापैकी यश आलेले आहे, मात्र शंभर टक्के धंदे बंद झालेले नाहीत. शहरात लपून छपून तर ग्रामीण भागातही अवैध धंदे सुरु आहेत. अमळनेर, पाचोरा, जामनेर, भुसावळ या तालुक्यांमध्ये धंदे सुरुच असून संबंधित पोलीस आजही या धंदे चालकांकडून हप्ते वसूल करीत आहेत.
ठळक मुद्देविश्लेषण शहरात लपून छपून धंदे सुरु कर्मचारीच करताहेत हप्ते वसुली