जळगाव : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लावता, तो मक्ता रद्द होऊन, आपले हित साध्य होईल या हेतूनेच काही पदाधिकारी सध्या मनपात कार्यरत झाले आहेत. सत्ताधाºयांमध्येच सफाईच्या मक्त्यावरून नवे शीतयुद्ध रंगले आहे.सफाईचा आधीचा मक्ता रद्द व्हावा यासाठी एक गट सक्रिय असून, तो रद्द होऊ नये यासाठी एक गट सक्रिय आहे. तर तिसरा गट प्रभागनिहाय काढण्यात आलेल्या सफाईच्या निविदा उघडून प्रभागनिहाय मक्ता देण्यासाठी सक्रिय झाला आहे.एकीकडे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करत असताना, दुसरी पदाधिकाºयाकची यंत्रणा मक्ता टेकओव्हर करण्यात गुंग आहे. शहराच्या सफाईसाठी वर्षभरापूर्वी काढण्यात आलेल्या ७५ कोटींच्या मक्त्यावरून सुरुवातीपासूनच राजकारण रंगले आहे. नाशिक येथील वाटरग्रेस कंपनीला मक्ता दिल्या पासूनया मक्यात काही नगरसेवकांचा रस असल्याने इतरांनी नेहमी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यातच मक्तेदाराला ही वर्षभरात कामाचे नियोजन करण्यात अपयश आल्यामुळे ज्यांनी हा मक्ता देण्यासाठी आघाडी घेतली होती अशा पदाधिकाºयांनाही हा मक्ता रद्द व्हावा अशी भूमिका घ्यावी लागली .आता मनपाने २४ फेब्रुवारी पासून मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेतले असल्याने पर्यायी व्यवस्था लावून हा मक्ता टेकओव्हर करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या तीन निविदांना ब्रेक का? वॉटरग्रेस कंपनीचे काम बंद केल्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रभाग समिती १, २ व ३ साठी सफाई कर्मचारी पुरविण्यासाठी मनपाकडून निविदा काढण्यात आली. मात्र, आता चारवेळा निविदा काढूनही निविदा प्रसिद्ध केली जात नाही. मनपा आरोग्य विभागाचे तिन्ही अधिकारी याबाबत वेगवेगळे उत्तर देतात.या निविदा न उघडण्यामागे काही पदाधिकारीच सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. प्रशासन ही संभ्रमात सत्ताधाºयामध्येच सफाईच्या मक्त्यावरून तीन गट सक्रिय झाले असल्याने मनपा प्रशासनातील अधिकारीच संभ्रमात आहेत. कारण जुना मक्ता रद्द करण्यापासून , तो रद्द करू नये, निविदा उघडण्यासाठी व त्या निविदा उघडू नये अशाप्रकारच्या सूचना मनपा अधिकाºयाना होत आहेत. त्यामुळे मोठा पेच मनपा प्रशासनासमोर उभा राहीला आहे.
जळगावात कचऱ्याची समस्या बिकट असताना निविदा काढण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:55 PM