शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

घर खरेदीस टाळाटाळ, दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 2:58 PM

चोपडा : येथे मधुबन नगरातील घराची सौदेपावती करून देऊन वर्ष लोटले तरीही खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा ...

चोपडा : येथे मधुबन नगरातील घराची सौदेपावती करून देऊन वर्ष लोटले तरीही खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, भोईवाड्यातील लताबाई अशोक खैरनार यांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मधुबन नगरातील गट क्रमांक १०३०, प्लॉट क्र. २१ चा सौदा प्लॉटच्या मालक मानीषा मनोज देशमुख व लोटन रमेश देशमुख, रा. अरुणनगर यांच्याकडून १३ लाख ५१ हजार रुपयांत केला. यापोटी त्यांना २ लाख ५० हजार रुपये रोख व ४५००० रुपये बँकेत भरणा करून एकूण २९५००० रुपये दिले आहेत. मात्र, त्यानंतर वर्ष लोटले तरी घराचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाºया मानीषा मनोज देशमुख व लोटन रमेश देशमुख, रा. अरुणनगर, चोपडा यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात लता अशोक खैरनार यांच्या फियार्दीवरून भाग ५, भादंवि ४२० व ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.