केºहाळे, ता. रावेर : शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या धोरणानुसार, थकीत कर्जदार वगळता नियमित कर्ज भरणाºया शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात घोषणा केल्याप्रमाणे आत्तापर्यंत पात्र शेतकºयांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा तडाखा तर दुसरीकडे शासनाची पाठ अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.यावर्षी कोरोनामुळे केळीचे भाव गडगडून गेले. अनेक दिवस लॉकडाऊनमध्ये केळी अक्षरश: सडून गेली. त्यानंतर अनलॉक झालं असलं तरीही अजून केळीला म्हणावा तसा भाव नाही. कापूस वेचण्यापूर्वीच भिजून गेला. पावसामुळे ज्वारीचीही पूर्णपणे वाट लागली.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र प्रत्यक्षात नियमित कर्ज भरणाºयांकडे कर्जमाफीने तोंड फिरवल्याचे दिसून येत आहे. हा विषय अजूनही विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेतकरी अजूनही प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची भाबडी आशा बाळगून आहे .दिलेले आश्वासन पाळण्याची मागणीसानुग्रह अनुदान म्हणून मिळणारी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आजच्या घडीला गरजेची ठरणार आहे. कारण केळीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खूप येऊन सुद्धा हातात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच वाºयामुळे नुकसान झाले तसेच अति प्रमाणात पाऊस झाल्याने तूर्तास ज्वारीची पूर्ण वाट लागल्याचे चित्र आहे. कापूस वेचणीपूर्वीच भिजत असून आलेला कापूस कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, अशी मागणी केली जात आहे.
नियमीत कर्ज भरणाऱ्यांना लाभाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:01 PM