आॅनलाईन लोकमतकजगाव ता भडगाव,दि.२ - शासनाने शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी व कुटुंबातील सदस्यांना रात्रंदिवस ई-सेवा केंद्र व ग्रामपंचायती समोर रांग लावावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हरडाऊनचा सर्वाधिक त्रास असल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर महा.ई-सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. कजगाव येथील एका केंद्रावर सकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राबाहेर शेतकºयांना रांग लावावी लागत आहे. दोन-दोन दिवस रांगेतशेतकºयांनी या केंद्रावर सकाळी आठ वाजेपासून रांग लावली होती. अनेक शेतकरी दोन दिवसांपासून रांगेत उभे राहून आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका अर्जासाठी किमान १५ ते २० मिनीट लागत असल्याने तासन्तास शेतकºयांना रांगेत उभे रहावे लागते.सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा केंद्रावर अर्ज भरत असताना सर्व्हर डाऊन होण्याची समस्या सर्वाधिक आहे. त्यातच बहुतांश वेळा सर्व्हरचा आवश्यक स्पीड नसणे, वीज पुरवठा खंडीत असणे, इंटरनेट सेवा बंद असणे यासारख्या अडचणी येत आहेत. रांगेत उभे राहून शेतकरी कंटाळलेले आहेत. त्यातच वयोवृद्ध शेतकरी असल्यास आधार कार्ड व बोटांचे ठसे उमटत नसल्याने अर्ज न भरता माघारी परत येण्याची वेळ येत असते.आंतरमशागतीचे दिवसकाही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्यानंतर आता उघडीप आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांकडून आंतरमशागीतचे कामे सुरु आहे. मात्र कर्जमाफीसाठी अर्ज भरत असताना काही प्रकरणांमध्ये शेतकºयांच्या वारसांना देखील उपस्थित रहावे लागत असल्याने कामांचा खोळंबा होत आहे.
तांत्रिक अडचणींवर तोडगा कसा निघणार कर्ज माफी अर्ज भरताना पती किंवा पत्नीच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी मोठी अडचण येत आहे. बोटांचे ठसे येत नसल्यास बायोमेट्रिक करावे लागते. त्याच्या दुरुस्तीसाठी ७ ते ८ दिवस लागतात. मात्र २० ते २५ दिवस झाल्यानंतरही शेतकºयांच्या बोटांचे ठशांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कजगाव चे शेतकरी लालसिंग भिमसिग पाटील, अजबसिग राघो पाटील, रवींद्र प्रल्हाद पाटील, लालसिंग शंकर पाटील, प्रशांत कैलास पाटील, निळंसिंग अजबसिग पाटील या शेतकºयांनी बायोमेट्रिक साठी अर्ज केले आहेत. मात्र अजूनही ते आलेले नाहीत.