जळगाव : शासनाकडून ब्रेक दी चेन संदर्भात आदेश जारी केले आहे, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने चौका-चौकांमध्ये फलक लावण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असल्याची माहिती फलकावर देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून तर सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असणार असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे.
================================
फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील खंडेराव नगर भागातील अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली असून अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी करीत आहे.
=============================
शासकीय अभियांत्रिकीच्या पत्राचा मासूकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुल्क आकारणीबाबत मंत्रालय व वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून काढण्यात आले आहे. या पत्राचा महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अभिजित रंधे यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री यांनासुध्दा निवेदन पाठविण्यात आले आहे.