शिबिराचे आयोजन जीएम फाउंडेशन व आर्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. शिबिरात सुमारे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासंदर्भात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी खबरदारी घेण्याच्या सल्ला देत घेण्यात येणाऱ्या आहाराविषयी टिप्स दिल्या. याबरोबरच सजगता बाळगण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे दर सोमवार व शुक्रवार नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
गरज पडल्यास संशयित रुग्णांचे सिटीस्कॅन, पी. एन. एस. चाचण्या आमदार गिरीश महाजन यांच्यावतीने मोफत करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, समाधान पाटील, चेतन रोकडे उपस्थित होते. डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. संदीप कुमावत, डॉ. विलास बाविस्कर, पोलीस कर्मचारी मधुकर सोनवणे, डॉ. योगेश ढाकरे, दीपक वाघ, अंजना नागरगोजे, विकास गायकवाड, सतीश बनसोडे, प्रमिला गोयर यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक आरोग्य दूत अरविंद देशमुख यांनी केले.
===Photopath===
250521\25jal_5_25052021_12.jpg
===Caption===
पहूर रूग्णालयात शिबिरादरम्यान रुग्णांची तपासणी करताना डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. हर्षल चांदा, डॉ. विलास बाविस्कर,अरविंद देशमुख व वैद्यकीय अधिकारी.