धुळे : मागील भांडणाची कुरापत काढल्याच्या कारणावरून जातोडे, ता.शिंदखेडा येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटातील एकूण 11 जण जखमी झाले असून परस्परविरोधी फिर्यादीवरून 22 जणांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून महिलांनी फिर्याद दिली असून त्यात विनयभंग केल्याचे नमूद केले आहे. 4पहिल्या गटाच्या फिर्यादीनुसार, गुलाम बारकू पटेल, जाबीर हनीफ पटेल, अनिस कादीर पटेल, मोईन सलीम पटेल, रियाज मेहमूद पटेल, निसार बशीर पटेल, नदीम गुलाम पटेल (सर्व रा.किम कुसुंबा, गुजरात), रहेनाबी अशपाक देशमुख, भिका गोडू पटेल, अशपाक देशमुख, गफ्फार ताहेर पटेल, शहाबान अशपाक देशमुख व मंजूर ताहेर पटेल यांच्याविरुद्ध तर दुस:या गटातील शकील गुलामनबी पटेल, वसीम सलीम पटेल, सलीम गुलामनबी पटेल, आसिफ सलीम पटेल, फारूख सलीम पटेल, फिरोजाबी शकील पटेल, लालू काळू पटेल, नजीर मुसा पटेल, जुबेदाबी नजीर पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीमुळे जातोडय़ावर संक्रांत!
By admin | Published: January 13, 2016 12:00 AM