जळगाव : रस्त्यात झालेल्या प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने साधना विजय धनगर (२४, रा. बोरनार) या विवाहितेचा व तिच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.साधना धनगर यांना १०८ या शासकीय रुग्णवाहिकेतून जळगावला आणले जात असताना रस्त्यातच जैन व्हॅलीजवळ प्रसुती झाली. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला होता. जिल्हा रुग्णालयात प्रसूती वार्डात महिलेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले, रक्ताच्या बाटल्या लावण्यात आल्या. मात्र तरीही रक्तस्त्राव थांबतच नसल्याने दीड वाजता साधना व नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने बोरनार गावात हळहळ व्यक्त होत आहे.पतीचा आक्रोश अन् सासऱ्यांना धक्कासाधना व बाळ अशा दोघांचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीने जोरदार हंबरडा फोडला तर सासरे शिवाजी धनगर यांना मानसिक धक्का बसला. त्यात त्यांच्या छातीत कळा निघायला लागल्या. अन्य नातेवाईक व रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी पती व सासऱ्यांना सावरत धीर दिला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी पतीचा जबाब घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.ू
अतिरक्तस्त्रावामुळे जळगावात प्रसूत महिलेसह बाळाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:27 PM