बहिणाबाई ज्ञानविकास विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे, जनार्दन रोटे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक टी.एस.चौधरी, राम महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रतिभा खडके, डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, डॉ.विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील, दिनेश चौधरी, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते आदींची उपस्थिती होती.
प्रगती विद्यामंदिर (फोटो)
प्रगती विद्यामंदिर शाळेत ऑनलाइन मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. प्रेमचंद ओसवाल, मंगला दुनाखे व मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संध्या अट्रावलकर तर आभार रमेश ससाणे यांनी मानले.
खुबचंद सागरमल विद्यालय (फोटो)
खुबचंद सागरमल विद्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी सुरेश आदिवाल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी नीता झोपे, मंगला सपकाळे, योगिनी बेंडाळे, कल्पना देवरे, सुनीता साळुंखे, योगेश पवार, लक्ष्मीकांत महाजन, भास्कर कोळी, संतोष चौधरी, राजेश इंगळे, प्रवीण पाटील, अजय पाटील, विजय पवार, पंकज सूर्यवंशी, राहुल देशमुख, संजय पाटील आदी उपस्थित होते.
मानव सेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर, मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा धेण्यात आली. यात प्रतीक राजपूत याने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच चित्रकला व निबंध स्पर्धाही घेण्यात आली. यामध्ये परेश पाटील या विद्यार्थ्याने बाजी मारली. दरम्यान, ऑनलाइन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून सहभाग नोंदविला होता.