आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या, ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनीकरताच जळगावात फटाके फोडून, पेढे वाटून मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून खान्देशवासीयांकडून करण्यात येत असलेली ही मागणी अखेर मान्य झाल्याने लढ्याला यश आल्याच्या प्रतिक्रिया खान्देशातून उमटत आहे. दरम्यान, बहिणाबाईंचे माहेर असलेल्या आसोदा गावात फटाके फोडून दिवाळीसारखा आनंद साजरा करण्यात आला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच जळगाव शहरासह जिल्हाभरात आनंदाला उधाण आले.२५ वर्षांपासून मागणीजळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची १५ आॅगस्ट १९९० रोजी जळगाव येथे स्थापना झाल्यानंतर गेल्या २५ वर्षांपासून खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. या दरम्यान १५ वर्षांपासून यासाठी विविध संघटनांच्यावतीने लढा तीव्र करण्यात आला.लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात ठरावगेल्या महिन्यात पाडळसे (ता. यावल) येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात जळगाव येथील मुविकोराज कोल्हे यांनी या आशयाच्या मागणीचे निवेदन दिले होते व उमविला बहिणाबार्इंचे नाव देण्याचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता. हा ठराव जेथे झाला त्या पाडळसे गावातही संध्याकाळी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.बहिणाबाई उद्यानासमोर पेढे वाटपजळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानात गुरुवारी संध्याकाळी बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले व पेढे वाढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन,माजी नगरसेवक विनोद देशमुख, नगरसेवक नितीन बरडे, ज्येष्ठ नाट्यकर्मी, शंभू पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, मुविकोराज कोल्हे, सुरेंद्र पाटील, सचिन नारळे, भैया चौधरी, डॉ. स्नेहल फेगडे, रुपेश ठाकूर, जुबेर खाटीक, युगल जैन, सुरेश पाटील, छोटू खडके, बंटी भारंबे, मिलिंद सोनवणे, संजय राणा आदी उपस्थित होते. विराज कावडिया, अमित जगताप, हरिष कोल्हे, प्रा. नीलेश चौधरी, किशोर भोसले, राजेश वारके, श्यामकांत सोनवणे, मंजीत जांगड, विनोद सैनी, पियूष हसवाल, मिलिंद पाटील, जय महाले, स्वप्नील वाणी, तेजस श्रीश्रीमाळ, उज्ज्वला वर्मा आदी उपस्थित होते.असोदा येथे दिवाळीबहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदा गावात तर गुुरुवारी फटाक्यांची आतीषबाजी करीत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गावात जणू दिवाळीच असल्याचा भास या निमित्ताने होत होता.‘लोकमत’चे आभारविद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याबद्दल लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी आनंद व्यक्त करीत सांगितले की, यासाठी यापूर्वीही ठराव केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या महाअधिवेशनात ठराव करण्यात आला व या ठरावास ‘लोकमत’ने ठळक प्रसिद्धी दिल्याबद्दल ‘लोकमत’ला धन्यवाद देतो, अशा शब्दात रमेश विठू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याचा मोठा आनंद आहे. ज्या-ज्या भागात जे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठांना त्या परिसरातील सत्पुरुषाची नावे आहेत. आपल्याकडे अशा व्यक्ती म्हणजे बहिणाबाई असून त्यांचे त्या क्षेत्रात कार्यही मोठे आहे. या निर्णयाचे स्वागत करतो.- रमेश विठू पाटील, कुटुंब नायक, लेवा पाटीदार समाज
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव; जळगावात आनंदाला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:24 PM
फटाके फोडून जल्लोष
ठळक मुद्दे३० वर्षांच्या लढ्याला यशअसोदा येथे दिवाळी