जळगाव/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीतर्फे जळगाव मतदार संघातून अंजली रत्नाकर बाविस्कर (शिंपी), रावेरमधून नितीन प्रल्हाद कांडेलकर (कुºहा काकोडा, ता. मुक्ताईनगर), तर नंदुरबारमधून कुºहावद ता़ शहादा येथील डी.जी. मोरे यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाली.पक्षाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीतर्फे जळगाव व रावेर तसेच नंदुरबार या तीन मतदार संघातून उमेदवार दिले जातील असे सांगितले होते. त्यानुसार पक्षाकडून तिनही मतदार संघासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेल्या अंजली बाविस्कर १९९५ पासून समाजसेवा तसेच आरोग्य, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत.रावेर लोकसभा मतदार संघातून नितीन प्रल्हाद कांडेलकर यांचे नाव निश्चित झाले आहे. मूळ शेती व्यवसाय असलेल्या कांडेलकर यांचे आजोबा तुकाराम कांडेलकर हे १२ वर्ष पंचायत समितीचे उपसभापती व १० वर्ष बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच मुक्ताईनगर शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या आई जानकीबाई कांडेलकर या कुºहा जि.प.गटातून जिल्हा परिषद सदस्या होत्या. २०१७ मध्ये त्यांनी स्वत: मुक्ताईनगर-निमखेडी गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढविली होती.नंदुरबारमधून डी.जी. मोरेनंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी दाजमल गजमल मोरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे़ मोरे हे राज्य गुप्त वार्ता विभागातून सहाय्यक आयुक्त या पदावरुन निवृत्त झाले आहेत़ आदिवासी एकलव्य समाज संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून परीचित आहेत. कुºहावद ता़ शहादा येथील ते मूळ रहिवासी आहेत़
बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:21 AM