चाळीसगाव, दि.26- इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन रद्द करुन बॅलेट पेपरचा वापर करावा, शेतक-यांची कर्जमुक्ती व्हावी यासह प्रमुख 14 मागण्यांसाठी चाळीसगाव येथे बुधवारी सकाळी 11 वाजता रेल्वे स्थानकापासून बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. बामसेफचे औरंगाबाद येथील वक्ते प्रदीप तळेकर व भुसावळ येथील हमीद शेख यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली. यावेळी प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, कमल नेतकर, किर्ती इंगळे, अलका मोरे, अॅड.कविता मोरे उपस्थित होते. मुकेश नेतकर, वनेश खैरनार, महेंद्र सूर्यवंशी, किरण मोरे, बंटी पाटील, रायबा जाधव, अकील शेख, राष्ट्रवादीचे अमोल चौधरी, य™ोश बाविस्कर यांच्या संयोजन समितीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास देवरे व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांना दिले.
पाचोरा येथे रेल्वे कृती समितीतर्फे मोर्चा
पाचोरा येथे सकाळी रेल्वे समस्यांबाबत मोर्चा काढण्यात आला. पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीने मोचार्चे नेतृत्व केले. रिक्षा संघटनांसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.