जळगाव : ठेकेदारीच्या कामातून ५४ लाख ६७ हजार ५०० रुपयात फसवणूक झाल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या विश्वंभर पांडूरंग तायडे (रा.मलकापूर) याचा जामीन अर्ज बुधवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. यापूर्वी एरंडोल न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला होता. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा तर फिर्यादीतर्फे ॲड.महेश काबरा व अॅड.सूरज जहांगीर यांनी काम पाहिले. ११ नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसांनी तायडे याला अटक केली होती. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत भूजल सर्व्हेक्षण व विकास संरक्षण विभागाचे ग्राऊंड बंधारा, नाला बंधारा यांचे काम पूर्ण झाल्यानंतरही ठेकेदार राजीव नंदलाल मणियार यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे मणियार यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल होता.
फसवणूक प्रकरणात जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 7:59 PM