भुसावळ : पैझरी, ता.यावल या आदिवासी पाड्यांवर देवगिरी कल्याणाश्रम व स्वामी विवेकानंद हायस्कूल यांच्यातर्फे विवेकानंद बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले.
या पाड्यांवर जवळपास ८० मुले हे वेगवेगळ्या वयोगटांतील आहेत. पाड्यापासून इतर गावांना शिक्षण घेण्यासाठी या मुलांना तीन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन देवगिरी कल्याण आश्रम, भुसावळ यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बालसंस्कार केंद्र सुरू केले. कल्याणाश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे यांनी फलकाचे अनावरण केले. अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष जयंतीलाल सुराणा होते. प्रमुख म्हणून डॉ.नीलेश भिरुड, डोंगरदे दत्त मंदिराचे स्वरूपानंद महाराज यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक काशीराम बारेला यांनी केले. अमोल ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.
ॲड.डी.बी. पंडित यांनी मुलांना स्वच्छता किट ब्रश, पेस्ट, साबण, टॉवेल दिले. अक्षय सराफ, सुरेश शर्मा, नीरज गंदे, मधुकर वाणी, ॲड.नीलेश भंडारी, ॲड.चित्रा आचार्य, ॲड.जयश्री देशमुख, दिनेश बारेला, प्रतीक्षा राणे, डोंगरदे सरपंच नवाज तडवी, योगेश पाटील, ॲड.राजेश बारी, ॲड.गोविंद बारी व ग्रामस्थ हजर होते. मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांनी आभार मानले. ॲड.जास्वंदी भंडारी, कल्याणाश्रमाचे वीरसिंग वसावे, सर्व शिक्षक, पोलीस पाटील जामसिंग बारेला, दलसिंग बारेला, संतोष बारेला यांनी परिश्रम घेतले.