जळगाव - शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालय व सामाजिक संस्थांच्यावतीने रविवारी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे यंदाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजवंदन करण्यात आले. शहरामधील शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन ध्वजारोहण करून मानवंदना दिली. तर विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली तर शाळांकडून विविध स्पर्धा सुध्दा घेण्यात आल्या.
प.वि.पाटील विद्यालय
गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,ओरियन इंग्लिश स्कूल, ओरियन सीबीएसई स्कूल तसेच किलबिल बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प. वि. पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत शिक्षक प्रवीण महाजन यांनी झेंडा गीत सादर केले तर उपशिक्षक योगेश भालेराव तसेच वैशाली वानखेडे यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला चंद्रकांत भंडारी, ब्रूस हेंडरसन, सुषमा कंची, दिलीपकुमार चौधरी, मंजुषा चौधरी आदींची उपस्थिती होती.
००००००००००००
शानभाग विद्यालय
सावखेडा येथील ब.गो.शानभाग विद्यालयात कोविड योद्धा डॉ. राहुल महाजन, त्यांच्या वडील श्यामराव महाजन आणि आई मंगलाताई महाजन यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे, शशिकांत पाटील, पद्माकर इंगळे, जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आदींच्याहस्ते भारतमाता प्रतिमा पूजन आणि ध्वजपूजन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय यादव यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमाप्रसंगी रंजना बाभूळके, सुरज बारी या संगीत शिक्षकांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
०००००००००००
सरस्वती विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रम सुवर्णलता अडकमोल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पार्थ जगताप, जयेश सोनवणे, धीरज मिस्तरी, भावेश मिस्तरी,चेतन सपकाळे, प्रणाली इंगळे, त्रिशा साळी, अंजली बागुल, उज्वला बारी, यामिनी पाटील, नम्रता बारी, दर्शन चौधरी, स्वाती पाटील या विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांची वेशभूषा साकारली होती. सुत्रसंचलन गिरीश महाजन व दीपाली देवरे यांनी केले.
०००००००००
के.के इंटरनॅशनल स्कूल (फोटो)
जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के.के.इंटरनॅशनल स्कूल येथे संचालक मनोज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. मुख्याध्यापिका वैशाली पंडित यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. संचालिका सीमा पाटील, सुलभा पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी, मनीषा दाभाडे यांनी केले.
०००००००००००००
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, सेमी विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक उमेश इंगळे यांच्यासह प्रकाश चौधरी यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले व वायुदलातील माजी अधिकारी प्रकाश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन मृणालिनी पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा साळुंके यांनी केले.