आॅनलाईन लोकमतजळगाव दि,५ : एरंडोल येथील कापसाचे व्यापारी बाळू रामू पाटील यांच्या खून प्रकरणात पप्पू उर्फ नागराज सुधाकर महाजन (वय २८ रा.जहांगीरपुरा, एरंडोल), सचिन आनंदा मराठे (वय ३४ रा.विद्या नगर, एरंडोल) व पंकज सुरेश धनगर (वय २८ रा. एरंडोल) या तिघांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, तिघांना वेगवेगळ्या प्रकारे ५ लाख ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून ही रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता, परिस्थितीजन्य पुराव्यावर ही शिक्षा सुनावण्यात आली, हेच या खटल्याचे वैशिष्ट आहे.अशी घडली घटनाबाळू पाटील ३० जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडे चार वाजता जेवण घरुन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.आर.१०५२) घरुन बाहेर गेले होते. तर २ फेब्रुवारी रोजी धरणगाव येथील माळी वाडा येथे पाटाच्या चारीत बाळू पाटील यांचे प्रेत आढळून आले होते. मयताच्या गळ्यावर व शरीरावर जखमा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दगडू पाटील यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.बाळू पाटील व सचिन मराठे हे दोन्ही कापसाचे व्यापारी होते. त्या व्यवहारातून बाळू पाटील यांचे सचिनकडे २५ लाख रुपये घेणे होते. ही रक्कम देण्याची गरज भासू नये यासाठी सचिन याने बाळू पाटील यांचा खून करण्यासाठी पप्पू व पंकज या दोघांना ४ लाखाची सुपारी दिली.
असे कलम अशी शिक्षाकलम ३०२ अन्वये : नागराज महाजन व पंकज धनगर या दोघांना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदकलम १२० ब : नागराज महाजन, सचिन मराठे व पंकज धनगर या तिघांना जन्मठेप. नागराज व पंकज यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तर सचिन याला ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दहा महिने साधी कैदकलम २०१ : नागराज व पंकज या दोघांना ५ वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदमयताच्या पत्नीला दंडाची रक्कम तिन्ही आरोपींना केलेल्या दंडाची रक्कम ५ लाख ६० हजार रुपये ही मयताची पत्नी पदमाबाई पाटील यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. घटनेच्यावेळी मयत बाळू पाटील यांचे वय ४२, पत्नी पद्माबाई यांचे वय ३५, मुलीचे १७ तर मुलाचे १५ असे होते. कुटुंबात कमविण्याचे कोणतेही साधन नसल्याने व आरोपींची परिस्थिती लक्षात घेता ही रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश दिले.