जळगाव : पाम तेलावरील आयातीवर निर्बंध वाढतच असून अगोदर आयात शुल्क दुप्पट करण्यापाठोपाठ आता थेट तयार पाम तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केवळ कच्चा माल आयात करता येणार असल्याने त्यावर येथे प्रक्रिया व वाहतूक खर्च वाढल्याने तेलाचे भावही वाढत आहे. या निर्णयामुळे या तेलाच्या भावात थेट २०० ते ३०० रुपये प्रती क्विंंटलने वाढ होऊन हे तेल ९८०० रुपये प्रती क्विंंटलवर पोहचले आहे.दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. त्यात गेल्या काही वर्षभरापासून पाम तेलाच्या भावात वाढ होत असल्याने सोयाबीन तेलाचेही भाव वाढत गेले.वाढते निर्बंधएरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते. त्यात गेल्या वर्षी थेट दुप्पट वाढ करून ते ३० टक्के करण्यात आले. त्यामुळे पाम तेलाचे भाव वधारले होते. त्यानंतर अमेरिकन डॉलरचे दर वाढत गेल्यानेही या तेलाचे भाव वाढत आहेत. गेल्या महिन्यात ७५०० रुपये प्रति क्विंटलवर असलेल्या पाम तेलाचे भाव वाढून ते ८८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले होते. त्यानंतर पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यात आणखी वाढ होऊन ते ९५०० ते ९६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले.आयातीवर बंदीआधी आयात शुल्क वाढविल्यानंतर आता मलेशियातून आयात होणाऱ्या या तयार पाम तेलाच्या आयातीवरच केंद्र सरकारने बंदी घातली आहे. हे तयार तेल आयात न करता कच्चा माल आता आयात करावा लागणार आहे. यात आता कच्च्या मालाची आयात झाल्यानंतर तो खाली करणे, त्यावर प्रक्रिया करणे व पुन्हा वाहतुकीसाठी वाहनात भरणे हा सर्व खर्च वाढल्याने तेलाचे भाव वाढत आहे.याचा परिणाम आठवडाभरात जाणवू लागला असून पाम तेलाचे भाव ९५०० ते ९६०० रुपये प्रती क्विंटलवरून ९८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.पाम तेलाचे भाव वाढल्यास सोयाबीन तेलाचेही भाव वाढतात. मात्र सध्या सोयाबीन तेल १०३ ते १०५ रुपये प्रती किलोवर स्थिर असल्याने तेवढा दिलासा आहे.तयार पाम तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याचेभाववाढतआहे.- मनीष देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.
तयार पामतेलाच्या आयातीवर बंदी, केवळ कच्चा माल आयात करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:35 AM