शेंदुर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी नगर पंचायतीसाठी होणाºया मतदानासाठी वापरण्यात येणाºया ईव्हीएम मशीनमधील ११ मशिन खराब निघाल्याने बुधवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण होते.राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या पदाधिकाºयांनी बॅलेट पेपरच्या साहाय्याने मतदान घेण्याची मागणी केली. निवडणूक निर्भयपूर्ण वातावरणात व्हावी यासाठी मतदानाच्या ४८ तासाआधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांना नगरपंचायत क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.नगरपंचायत निवडणूक मतदान मशीन सेटिंग वर सीलिंगचा कार्यक्रम होता. त्यामुळे माहेश्वरी मंगल कार्यालयात महसूल विभागाचे कर्मचारी व शासकीय अधिकारी सकाळी नऊ वाजेपासून हजर होते राजकीय पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधी आल्यानंतर सकाळी अकरा वाजता नियोजित कार्यक्रमानुसार सुरुवात झाली सर्वप्रथम मतदान मशीनच्या जवळ मोबाईल ब्लूटूथ सुरु केले असतात मोबाईल कनेक्टिंग पासवर्ड मागत होता. त्यामुळे काही वेळ शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर थोड्या वेळाने राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील घड्याळाचे बटन दाबले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण होते. परंतु तात्काळ ते मशीन बदलवित दुसरे मशीन लावण्यात आले. जवळपास ११ मशीन खराब स्थितीत असल्याने ते बदलण्यात आले. त्यामुळे काही काळ वातावरण तापले. याबाबत शंका निर्माण होऊन काहींनी व्हिडीओ व्हायरल केले.नादुरुस्त मशिनचा व्हिडीओ व्हायरल करणाºयांवर गुन्हाशेंदुर्णी नगरपंचायतीचे मतदान हे निपक्षपाती व पारदर्शक होणार असल्याचे जितेंद्र पाटील यांनी सांगितले.ईव्हीएम मशीन मध्ये कोणतेही आक्षेप घेण्यासारखं काही नाही. जे ईव्हीएम मशीन नादुरुस्त होते त्यांना बाजूला ठेवले आहे. चांगल्या मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून ९ डिसेंबर रोजी होणाºया मतदानावेळी त्याचा वापर केला जाणार आहे. नादुरुस्त मशीनचा कुणी चुकून मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला असल्यास संबधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिला.मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदीशेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसोबतच धुळे महानगरपालिकेची निवडणूक असल्याने ती मार्गदर्शक ठरत आहे. निवडणुकीच्या कालावधीत बाहेरून काही लोक येऊन अर्थपूर्ण व्यवहार अथवा मतदानावर आर्थिक प्रलोभने अथवा दडपशाहीचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होऊ देणार नाही. ही शक्यता गृहित धरून धुळे महानगरपालिकेत निवडणूक कार्यक्रमात बाहेरून येणाºया नेत्यांना व इतर लोकांना प्रतिबंध केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सार्वत्रिक निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडावी म्हणून शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींना प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदानाच्या ४८ तास अगोदर नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्य करण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आदेश दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
शेंदुर्णीत मतदानाच्या ४८ तासांपूर्वी बाहेरील राजकीय नेते व कार्यकर्त्यांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:06 PM
शेंदुर्णी नगर पंचायतीसाठी होणाºया मतदानासाठी वापरण्यात येणाºया ईव्हीएम मशीनमधील ११ मशिन खराब निघाल्याने बुधवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण होते.
ठळक मुद्देनिवडणुकीमुळे तीन दिवस दारू दुकाने राहणार बंद११ नादुरुस्त ईव्हीएम मशिनमुळे गोंधळनादुरुस्त मशिनचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा