शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

रावेर तालुक्यातील तांदलवाडी पाठोपाठ अटवाड्यातूनही केळी निर्यात केंद्रास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 1:13 AM

क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत.

ठळक मुद्देरावेरच्या दक्षिणेतून पूर्वेकडे वाहू लागले केळी निर्यातीचे वारेविशाल रामेश्वर अग्रवाल यांचा कृषीसेवाभावाचा वारसा

रावेर, जि.जळगाव : क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच्या माध्यमातून केळी निर्यातीचे वारे तालुक्याच्या पूर्व भागात वाहू लागले आहेत. तालुक्याचा कर्जोद, वाघोड, खानापूर, निरूळ व चोरवड भाग म्हणजे चंद्रावरील काळ्या खाचखळग्यांसारखा समृद्धीला लाजवणारा वाळवंट होऊ पाहत असताना मात्र लगतच्या तापी काठावरील अटवाडे गावात केळी निर्यात केंद्राचा शनिवारी प्रारंभ झाल्याने केळी उत्पादकांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावशिवारातील तरूण शेतकऱ्यांनी अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड करीत स्वंयचलीत यंत्राद्वारे विद्राव्य खतांचे फर्टिगेशन तथा फळ निगा तंत्रज्ञानासह केळीचे काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान अवलंबून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाचे केंद्र ठरले आहे. किंबहुना या पारंपरिक शेतीची कात टाकून व्यावसायिक शेतीची कास धरणाऱ्या उद्यमशील शेतकऱ्यांनी तांदलवाडी गावाला केळी निर्यात केंद्राची ओळख निर्माण करून दिली.त्या पावलावर पाऊल ठेवत अटवाडे येथील विशाल रामेश्वर अग्रवाल या आॅटोमोबाईल इंजिनीअर असलेल्या युवा शेतकºयाने आपल्या दातृत्वशील आजोबा शंकरलाल अग्रवाल यांच्या कृषीसेवाभावाचा वारसा पुढे चालवत, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरून टिश्यूकल्चर केळीचे गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळी उत्पादनाला सुरूवात केली. जळगाव येथील निर्यातक्षम केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी निर्यातक्षम केळीचे जैन इरिगेशन द्वारा अरब राष्ट्रांत निर्यात केली. मात्र, तांदलवाडीप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागातील या वाळवंटात केळी निर्यात केंद्र फुलावे अशी अभिलाषा बाळगून विशाल अग्रवाल यांनी आजपासून ऋची निर्यात केंद्राची स्थापना करून स्वत:च्या शेतातील गुणात्मक दर्जाची निर्यातक्षम केळीची पॅकेजींग प्रक्रिया पूर्ण करून ओमान या अरब राष्ट्रात नियार्तीला शुभारंभ केला. मुंबई तथा गुजरात मध्ये मुख्यालय असलेल्या देसाई फ्रुट या मध्यस्थ कंपनीद्वारा निर्यातीला शुभारंभ केला आहे. यावेळी माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील, सरपंच गणेश महाजन, उपसरपंच चंद्रकात पाटील, संतोष पाटील, भास्कर कुयटे, नितीन पाटील, रामेश्वर अग्रवाल, वरूण अग्रवाल, शैलेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. दररोज २० टन निर्यातक्षम केळी सतत चार ते पाच दिवस सावदा येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये निर्यात करण्यासाठी साठवून व तपमान नियंत्रीत करून कंटेनरने मुंबई जेएनपीटी बंदरावरून ओमान या आखाती राष्ट्रात तब्बल २१ दिवसांनी पोहोचणार आहे.सद्य:स्थितीत खानापूर पंचक्रोशीतील निर्यातक्षम केळी उत्पादकांची केळी तात्पुरत्या स्वरूपात शेतातचं पॅकेजिंगची प्रक्रिया करून देसाई फ्रुट कंपनीची एजन्सी घेऊन ही केळी निर्यात केली जाणार आहे. आॅक्टोबरपासून पॅकेजिंग हाऊस उभारून ऋची निर्यात केंद्राला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न राहील.-विशाल अग्रवाल, अटवाडे, ता.रावेर

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर