साकळी, ता.यावल : बºहाणपूर येथे केळी भावात तेजी कायम असून तेथे उच्च प्रतीच्या केळीचे भाव १२ साठी २५५३ असे झाले आहे. मात्र रावेरसह जिल्ह्यात केळी भाव ९ तारखेला वाढल्यानंतर तेव्हापासून भाव स्थिर आहे. अर्थात केळीच्या मागणीत वाढ कायम आहे, असे असताना ही रावेरसह जिल्ह्यात केळी भाववाढ थांबली आहे.बºहाणपूर येथे मात्र केळी भावात तेजी कायम आहे. गेल्या ९ तारखेला तेथे केळी भावाने पुन्हा सर्वोच्च भावाचा २६०० रुपये असा विक्रम केला. १० तारखेला तेथे भाव २५४५ असे झाले. ११ तारखेला पुन्हा भावात घसरण होऊन ते २४७५ रुपये असे झाले आणि १२ तारखेसाठी बºहाणपूर येथे केळी भावात वाढ होऊन २५५३ असे झाले. आवक १९ ट्रक अशी वाढून भाव ११५१ ते २५५३ असे वाढले. रावेरसह जिल्ह्यात ही केळीला बहुप्रतिक्षेनंतर चांगले दिवस आले असल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत उच्च प्रतीच्या दर्जेदार केळीला जास्त भाव मिळून १६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. (वार्ताहर)
बºहाणपुरात केळी भाव पोहोचले अडीच हजारांवर
By admin | Published: February 12, 2017 1:06 AM