ऑनलाईन लोकमतभुसावळ,दि.19 - भुसावळातील बांधकाम व्यावसायिक सानिया कादरी यांनी शेतक:यांकडून केळी खरेदी केली मात्र त्यापोटी पैसे न देता फसवणुक केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सानिया कादरी यांच्या शहरातील जामनेररोडवरील बंगल्यावर संतप्त महिला व पुरुष शेतक:यांनी हल्ला केला. शेतक:यांनी कादरी यांच्या बंगल्याची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे.सानिया कादरी यांनी गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात रावेर आणि यावल व तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यासोबत केळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. त्यातच त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम वाढत गेली.
हल्ला झाला त्यावेळी सानिया कादरी घरात नव्हत्या, असे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.