केºहाळे, ता.रावेर : गत काही दिवसांपासून थंडीचा पारा असह्य झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे करप्यासह चरक्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे ऐन निसवण्याच्या बहारात असलेली केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रब्बीतील हरभरा, मका, गहू या पिकांसाठी थंडी उपायकारक असते. परंतु केळीसाठी अतिथंडी अपायकारक ठरत आहे. थंडीमुळे केळीच्या पानांवर पिवळसरपणा आल्यामुळे चरका आला आहे. यामुळे पाने कोरडी पडण्यास सुरुवात म्हणजेच पाने निर्जीव होत आहेत. याचा परिणाम खोडाच्या वाढीवर प्रत्यक्ष झाला आहे. प्रकाश क्रिया मंदावल्यामुळे पानांच्या पेशीद्वारे मिळणारे ऊर्जास्त्रोत थांबतात व जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य घेण्यास मदत होत नाही. यामुळे खोडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मृगबहार केळीच्या लागवड केलेल्या बेण्याप्रमाणे जानेवारी महिन्यात बºयाच शेतकºयांच्या शेतातील केळीची खोडे निसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याच वेळेत थंडीने घात केल्यामुळे केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. याचा थेट परिणाम केळीच्या घडावर होत आहे. कारण पुरेसे अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे घडाची निसवण पूर्णत: होत नाही. परिणामी घड लहान पडत आहेत व सरासरी उत्पन्न घटणार आहे. केळी उत्पादनावर मात करण्यासाठी केळीचे घड निसवण्याची प्रक्रिया तेवढीच महत्त्वाची आहे. केळी लागवड व वाढ झाल्यानंतर खरा भाग निसवण्याचा असतो. निसवण चांगली व दमदार झाल्यास घडाचे वजन, केळीची रुंदी, लांबी मोठी असते, यामुळे उत्पादनाची सरासरी गाठता येते. आधीच काहीशा प्रमाणात असलेल्या करप्यामुळे केळी खोडांच्या खालच्या बाजूची पाने कोरडी पडलेली आहेत. मात्र थंडीच्या वाढीमुळे खोडांच्या वरील पानेसुद्धा पिवळी पडून निर्जीव होत असल्याने करप्याला बळ मिळत असते. त्यामुळे एकंदरीत केळीची वाताहत होते. (वार्ताहर) उत्पन्नावर परिणाम: उपाययोजना हव्यात...४कडाक्याची थंडी आणि करप्याची लागण यामुळे केळीच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता जाणकार शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. करप्यावर प्रभावी ठरणारी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची शेतकºयांची मागणी आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांवर मोठ्या प्रमाणावर करप्याचे आक्रमण झाले आहे. अतिप्रमाणात थंडी केळीकरिता अत्यंत नुकसानकारक आहे. यामुळे चरका व करप्याचे प्रमाण जास्त आहे. -प्रवीण महाजन, प्रगत शेतकरी, ऐनपूर
कडाक्याच्या थंडीमुळे केळी गारठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 11:27 PM