शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जळगावात राष्टÑवादीने फेकली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी, आंदोलनाला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:03 PM

पोलिसांकडून बळाचा वापर

ठळक मुद्देमाजी पालकमंत्र्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीलोटालोटीत कुणाची चप्पल तर कुणाचा मोबाईल हरवला

जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादकांना वादळ व गारपिटीची नुकसान भरपाई शासनामार्फत मिळण्यासाठी शिवतीर्थ मैदान चौकात (कोर्ट चौकात) आयोजित निषेध व केळीफेक आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ मैदानासमोरच असलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर केळी फेकल्याने तसेच विनापरवानगी भर चौकात रस्त्यावर सभा घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांसह राष्टÑवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही झाली.मध्यप्रदेशात भाजपाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण शेतीची स्वत: पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकºयांना जागेवरच मदत जाहीर करतात आणि महाराष्ट्र राज्यातही भाजपाचेच सरकार असून पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री व कृषीमंत्री तसेच प्रभारी मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील हे पाहणीस तर आले नाही परंतु मदतीच्या समितीचे महत्त्वाची तीन खाती त्यांच्याकडे असल्यावर सुद्धा अद्याप १९ दिवसांत कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. दरम्यान भाजपाचे शिष्टमंडळ राज्यात व केंद्रात भेटल्यावर सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकºयांचा सरकारवर रोष व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव धोंडगे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्टÑवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार आदींच्या नेतृत्वाखाली सोमवार, १९ जून रोजी दुपारी दीड वाजता शिवतीर्थ मैदान चौकात सरकार विरोधात रोष व निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. तसेच काहीदिवसांपूर्वी जिल्ह्यात केळीच्या नुकसानीची पाहणी करणाºया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दौºयातराष्टÑवादी किसान सभेचे सोपान पाटील यांनी पालकमंत्री का पाहणीसाठी आले नाहीत? याचा जाब विचारल्याने त्यांना धक्काबुक्की झाल्याच्या वादाची पार्श्वभूमीही या आंदोलनाला होती. त्यासाठीच हे आंदोलन गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते.शिवतीर्थ मैदानापासून आंदोलनाला सुरूवातशिवतीर्थ मैदानाजवळील चौकात कृषक भवनजवळ दुपारी १ वाजेपासूनच राष्टÑवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी जमायला सुरूवात झाली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत शिवतीर्थ मैदानात शिरले. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोरच रस्त्याच्या दुसºया बाजूला या मैदानाचे प्रवेश असल्याने तेथे केळीचे घड भरलेले ट्रॅक्टर आधीच उभे केलेले होते. पदाधिकारी शिवपुतळ्याचे पूजन करून येईपर्यंत कार्यकर्त्यांनी हे ट्रॅक्टर रस्त्यावर आणत महाजन यांच्याकार्यालयासमोर रस्ता दुभाजकाजवळ ट्रॅक्टरमधील केळी ओतून दिली.माजी पालकमंत्र्यांसह पदाधिकाºयांना धक्काबुक्कीमहाजन यांच्या कार्यालयापासून या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हटविल्यानंतर ते सगळे पुन्हा भारत कृषक भवन समोरील रस्त्यावर सावलीत जमले. तेथे रस्त्यावरच कापडी पट्ट्या टाकून रस्ता अडवून छोटेखानी सभा घेण्याची तयारी सुरू झाली. माजी पालकमंत्री देवकर मार्गदर्शन करीत असतानाच डीवायएसपी सचिन सांगळे, तसेच अधिकारी व कर्मचारी धावतच तेथे आले. डीवायएसपी सांगळे यांनी आक्रमक भूमिका घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. ते एवढे आक्रमक होते की, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना छातीला हात लावून पाठीमागे ढकलले. तसेच इतर अधिकारी, कर्मचाºयांनी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव धोंडगे, जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, अ‍ॅड.रविंद्र पाटील आदींना धक्काबुक्की केली. त्यामुळे कार्यकर्ते चिडले. अखेर पदाधिकारी व सांगळे यांच्यात चर्चा होऊन रस्त्याची जास्त जागा न अडविता पाच मिनिटांत धोंडगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपJalgaonजळगाव