जळगाव - पंधरा दिवसांपूर्वी २,७०० ते ३,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले केळीचे भाव पंधरा दिवसांच्या आतच १,५०० ते १,७०० रुपयांनी घसरले असून सद्य:स्थितीत ११०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राष्ट्रीय केळी दिवसाच्या दिवशीच केळीच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, तसेच आगामी काही दिवसांत केळीच्या दरात अजून घट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे.
भाव घसरल्याचे कारण रमजान संपत आल्याने निर्यात ७५ टक्क्यांनी घटली इक्वेडोर व फिलिपिन्सवरून स्वस्त केळीचा पुरवठा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केळी बाजारात व आंबा बाजारात आल्याने केळीच्या विक्रीवर परिणाम निर्यातीला समस्या येत असल्याचे कारणदेखील आहे.
रमजानच्या काळात केळ्यांना मोठी मागणी असेल असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. मात्र तेवढी मागणी नव्हती. त्यामुळे भाव घसरत गेले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.