अट्रावल, ता.यावल : येथून जवळच असलेल्या यावल शिवारातील लीलाधर प्रभाकर पाटील यांच्या गट क्र. ८८८ मधील केळी बागेचे अज्ञातांनी नुकसान केले. ही घटना सोमवारी रात्री घडली. यात पाटील यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेने अट्रावलसह परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लीलाधर प्रभाकर पाटील यांनी मागील वर्षी सुमारे पाच हजार केळी खोडांची लागवड केली होती, त्यांनी केळी पिकाची वर्षभर जपणूक केली. योग्य वेळी खतांचे डोस दिले त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केळी निसवायला सुरुवात झाली. काही खोडे ही कापणी योग्य झाले होते.सुदैवाने यावर्षी केळीला चांगले भाव आहेत. उत्पन्नही चांगले येणार होते. त्यांनी घेतलेले कर्ज फेडून चार पैसे शिल्लक राहतील, अशी अपेक्षा पाटील यांची होती. या आशेवर त्यांचा मुलगा शेतात पीक पाहण्यासाठी जात असे. ८ रोजी सायंकाळी त्यांनी शेतात फेरफटका मारला व रात्री १० वाजता पाटील याचा मुलगा पाणी लावून घरी आला. ९ रोजी सकाळी शेतात गेला असता त्यांचे सर्व स्वप्न भंग पावले. कोणीतरी अज्ञाताने लीलाधर पाटील यांच्या शेतातील ५०० निसवलेली केळीची झाड कापून फेकलेले त्यांना आढळले. नुकसान पाहून पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. वर्षभर केलेली मेहनत वाया गेली. याबाबत लीलाधर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत. (वार्ताहर)वढोदा येथे शॉर्ट सर्किटमुळे मका जळून खाककुºहा(काकोडा), ता.मुक्ताईनगर - वढोदा शिवारातील शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत १५० क्विंटल मक्याचा ढीग जळून खाक झाला. यात सव्वादोन लाखांचे नुकसान झाले. वढोद्याचे माजी सरपंच संतोष रामभाऊ खोरखेडे यांच्या शेतात सुमारे १५० क्विंटल मक्याचा ढीग होता. ढिगाच्यावरूनच वीज वितरण कंपनीची मुख्य वीज वाहिनी गेली असून वाहिनीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या गंजीला आग लागली. आगीत १५० क्विंटल मका जळून खाक झाला. संतोष खोरखेडे यांनी माहिती दिल्यावरून तलाठी जे.एच.चौधरी, वीज कंपनीचे अभियंता राठोड यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस पाटील वसंत वाघमारे उपस्थित होते. मक्याची कापणी केल्यानंतर संबंधीत शेतकºयाने मक्याची गंजी शेतात ठेवली होती. मका तयार करणार त्याआधीच आग लागल्यामुळे शेतकºयाच्या तोंडचा घास हिसकावला गेला आहे. (वार्ताहर)
केळी कापून फेकली, दोन लाखांचे नुकसान
By admin | Published: February 11, 2017 12:26 AM