ठळक मुद्देअसे प्रकार जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणारे
हितेंद्र काळुंखेजळगाव- जिल्हा परिषदेत अपहार आणि गलथान कारभाराचे अनेक नुमने पुढे येत राहिल्यताने जिल्हा परिषदेची ओळख आता जणू अपहार आणि गलथान कारभाराचे केंद्र म्हणून झाली आहे. आतापर्यंत अनेक गैरप्रकार समोर आले परंतु काहीच हाती लागले नाही. यामुळे गैरप्रकार करणारे आणि अधिकारी यांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे. एकीकडे असे हे प्रकार चर्चेचे ठरत असताना आता जिल्हा परिषदेत पदाधिकारी तेच अधिकारी यांच्या हमरीमुतरी आणि मारहाणीच्या घटनांनी जिल्हा परिषदेचे वातावरण गढूळ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे व सदस्य पवन सोनवणे या काका- पुतण्या मध्ये एका विषयावरुन जुंपली होती. दोघांनीही एकमेकावर सभ्यता सोडत आरोप- प्रत्यारोप केले. एवढेच नाही तर पवन सोनवणे हे काका प्रभाकर सोनवणे यांच्या अंगावर धावून गेले. इतर सदस्यांनी त्यांना रोखले नसते तर या दोघांमध्ये हाणामारीची वेळ आली असती. गेल्या आठवड्यात बालविकास अधिकारी आर. आर. तडवी आणि बचत गट चालक महिलेचा पती कादर तडवी यांच्यात बचत गट बंद करण्यावरु वाद झाला. एवढेच नाही तर अधिकारी तडवी यांनी आपणास मारहाण केली, अशी तक्रार कादर तडवी यांनी पोलिसात दिली. मात्र आर. आर. तडवी यांनी या घटनेचा इन्कार करीत कादर यांनी आपणासच धमकी दिल्याचे म्हटले आहे. या घटनेत सत्यता काय आहे ? हे ठामपणे हे लगेच सांगता येत नसले तरी असे प्रकार जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणारे आहेत, हे नक्की. या प्रकारानंतर लगेचच दुसºया दिवशी टेंडर वरुन माजी सदस्य व एका महिला सदस्यच्या पतीमध्ये खडाजंगी झाली. वास्तविक नियमानुसार जे होत असेल ते होवू देणे गरजेचे आहे. परंतु असे न होता मी म्हणेल तेच झाले पाहिजे अशी काहींची भूमिका असते. तर काही वेळेस चुकीचेही घडत असले तरी योग्य मार्गाने विरोध होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचा बनतोय आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 9:48 AM