सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे हा भुसावळातील एका बँड पथकात वादक म्हणून कामाला होता. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे पैशाची आवक बंद झाली. त्यामुळे त्याने जळगाव शहरात येऊन सायकल चोरीचा मार्ग निवडला. सायकल चोरीची फारशी ओरड होत नाही, त्यामुळे कोणाला संशय येणार नाही व पकडलेही जाणार नाही असा समज झाल्याने त्याने रिकाम्यावेळी थेट सायकली चोरी करण्यास सुरूवात केली होती. जळगाव शहरात येऊन सायकल चोरली की भुसावळला नेऊन विकायची असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दोन महिन्यात त्याने तब्बल १८ सायकली चोरल्या.
एक हजार रुपयात सायकलची विक्री
चोरलेल्या सायकली साबळे हा एक हजार रुपयात विक्री करीत होता. बुधवारी सकाळी आठ वाजता तो पुन्हा जळगावात आला. टॉवर चौकात फिरत असताना शहर पोलीस ठाण्याचे प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे, राजकुमार चव्हाण यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी साबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या पॅण्टच्या खिशात चाव्यांचा गुच्छा होता. यावरून संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सायकल चोरीची कबुली दिली. सुरुवातीला सहा सायकली काढून दिल्या. यांनतर पुन्हा खाक्या दाखवताच त्याने १८ सायकली चोरल्याची कबुली दिली. साबळे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
((((((((कृपया हेडिंग बदलून घेणे- बरोबर वाटत नाही)))))))))